vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

परिवहन व बंदरे विभाग-राज्यात ॲप बेस वाहनांसाठी धोरण लागू

 

राज्य प्रतिनिधी-राज्यातॲप  बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण  लागू करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यात ॲप बेस वाहनांसाठी समुच्चयक धोरण तयार करण्याकरिता सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा अहवाल, मोटार वाहन अधिनियम व नियमातील तरतुदी याअनुषंगाने राज्यामध्ये हे समुच्चयक धोरण लागू करण्यात आले आहे. या धोरणांतर्गत ॲप बेस वाहन सेवा सुरू करण्यासाठी संबंधित वाहन मालकास विविध सुरक्षाविषय बाबींची पुर्तता करावी लागणार असून यामुळे प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होणार आहे. राईड पूलिंगचा पर्याय निवडणाऱ्या महिला प्रवाशांना सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून केवळ महिला चालक, प्रवाशांसोबताचा प्रवासाचा पर्याय उपलब्ध करून जाणार आहे.

ॲप बेस वाहनांसाठी संबंधित अर्जदाराने मार्गदर्शक तत्त्वांसह माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० अंतर्गत सर्व तरतुदींचे पालन करणे आवश्यक आहे. अप बेस वाहनांसाठी अग्रीगेटरकडे सुरक्षा मानकांची पुर्तता करणारे अप / संकेतस्थळ असणे आवश्यक राहील. वाहनांचे रिअल टाईम जीपीएस ट्रॅकिंग, आपत्कालीन संपर्क क्रमांक, चालकांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक असेल. चालकांना मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रशिक्षण घेणे तसेच चालक व सहप्रवाशी यांच्यासाठी विमा आवश्यक करण्यात आला आहे. प्रवाशांना आणि चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे जलद निराकरण सुनिश्चित करण्यासाठी, तक्रारींचे निवारण करण्यासाठीची यंत्रणा असणे आवश्यक करण्यात आले आहे. राज्यात समुच्चयक धोरण लागू करण्याबाबतची नियमावली स्वतंत्रपणे प्रकाशित केली जाणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आळंदी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व शुभारंभ इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

राज्यात भू-करमापक संवर्गातील ९०३ पदांची भरती १ ते २४ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

पुढील ३ तासात मुंबई मुंबई उपनगर पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांत काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यांसह ताशी ५०-६० किमी वेग जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क रहावे. – मंत्रालय

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणार- सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

वनविभागापुढील आव्हानांचा यशस्वीपणे सामना करून वनसंपदेचे रक्षण करा – प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या दुसऱ्या सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ उत्साहात संपन्न..

vishwatmaklokswamivarta

ताणतणाव व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम*

vishwatmaklokswamivarta