vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

*ओबीसींच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

 

*सर्वपक्षीय बैठीकीला निमंत्रित न केल्याबद्दल राज्यसरकार विरुद्ध रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराज*

 

मुंबई दि. 28 – ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत. स्थानिक स्वराज संस्थेत ओबीसींच्या आरक्षित जागा आवश्यक आहे.त्यामुळे ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत ही आपली भूमिका असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत काल सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक राज्य सरकार तर्फे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सर्व पक्षीय नेत्यांना निमंत्रीत करण्यात आले. मात्र रिपब्लिकन पक्षाला निमंत्रित करण्यात आले नाही. याबद्दल रिपब्लिकन पक्ष तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे ना रामदास आठवले यांनी सांगितले.

राज्यसरकार तर्फे आयोजित सर्वपक्षीय बैठकांना रिपब्लिकन पक्षाला निमंत्रण का दिले जात नाही याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवुन जाब विचारणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी कळविले आहे.

 

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण’ योजनेअंतर्गत १.१० लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची निवड साठ हजाराहून अधिक युवा प्रशिक्षणासाठी रुजू- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ, पर्यावरणशील, प्लास्टिकमुक्त दिवाळीसाठी नवी मुंबईकरांना आवाहन आणि महापालिकेकडून उपाययोजना-मुख्य रस्ते साफसफाई व प्रक्रियाकृत पाण्याने धुण्यामुळे वायू प्रदूषणाचे प्रमाण कमी झाल्याने नागरिकांकडून समाधान

vishwatmaklokswamivarta

भारताच्या राष्ट्रपती, श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 10व्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचे उद्घाटन केले “आम्ही स्त्रीच्या डोळ्यातून एक अश्रू देखील पडू देऊ शकत नाही,” – गुरुदेव श्री श्री रविशंकर

vishwatmaklokswamivarta

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. प्रकरणी निषेध जोडे मारो आंदोलन. हुतात्म चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत मोर्चा चे आयोजन राष्ट्रवादी शरद पवार उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे नाना पाटोळे सहभागी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी; विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’!

vishwatmaklokswamivarta

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलØ जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन, चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta