
टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक.
प्रतिनिधी: टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. भाविनाने टेबल टेनिसमधील क्लास 4 क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिलीये. भाविनाची कामगिरी ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटलंय.
भाविनाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल करुन तिचे अभिनंदन केले. भविष्यातील कारकिर्दीसाठीही मोदींनी भाविकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात तिने केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. देशातील अनेक युवा खेळाडूंना यामुळे प्रोत्साहन मिळेल, असेही मोदींनी म्हटले आहे.
टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरलीये. अंतिम सामन्यात चीनच्या यिंग झोउ हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत तिने तगडी फाइट दिली. पण या सामन्यातील पराभवामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.



