vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यात मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, तर देव कुठे आहेत? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, तर देव कुठे आहेत? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 

मुंबई : प्रतिनिधी  : राज्यात मंदिरं बंद आहेत, प्रार्थनास्थळ बंद आहेत, तर देव कुठे आहेत? देव केवळ मंदिरात किंवा प्रार्थनास्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आलेला आहे. हा खरा देव आहे. जो आपला जीव वाचवतोय. हे हॉस्पिटलसुद्धा एखाद्या मंदिरासारखं आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  म्हणाले. मुंबईत नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी  कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी डॉक्टरांचे कौतुक केले.

नायर रुग्णालयाचा १०० वर्षांचा प्रवास थक्क करणार आहे. एखाद्या संस्थेची सुरुवात होते. पण ते टिकविणे कठीण असते. प्रतिकूल काळात, भांडवलाचा पत्ता नसताना केवळ जिद्दीच्या बळावर काय होऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नायर रुग्णालय आहे. व्यासपीठावर आमचीच गर्दी जास्त आणि डॉक्टर कमी आहेत. गेल्या १०० वर्षांत या रुग्णालयात डॉक्टरांनी जीव ओतून रुग्णाचे प्राण विचविण्याचे काम केले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.अहोरात्र मेहनत काय असते ते रुग्णालयात पाहायला मिळते. व्यथा घेऊन आजाराने त्रस्त होऊन लोक रुग्णालयात येतात आणि हसत घरी जातात. कोविड काळात रुग्णालयाने काय केलंय हे सांगायची गरज नाही. सरकार येऊन २ महिने झाले आणि अनाकलनीय असा कोरोना व्हायरस आला. सुरुवातीचे दिवस कठीण होते. कोरोनाची दहशत होती. पण, त्या परिस्थितीतही डॉक्टरांनी चांगले काम केले. आज कौतुक आमचे होते. पण, खरे मानकरी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी आहेत. या डॉक्टरांना आज मी मानाचा मुजरा करतो, असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीतील नागरिकांना आता ‘स्पेक्स २०३०’ उपक्रमाद्वारे नेत्रसेवा मिळणार  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जागतिक आरोग्य संघटनेचा उपक्रम

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, ट्विट करत म्हणाले..

vishwatmaklokswamivarta

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचेगुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

संजय राऊत हाणा मला, सोमय्यांनी प्रत्यक्ष हातात जोडे घेतले, भर प्रेस कॉन्फरन्समध्ये

vishwatmaklokswamivarta

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. शशी थरुर यांना मोठ्या फरकानं मात देत मोठ्या मताधिक्यानं  निवडून आले.

vishwatmaklokswamivarta

समाजाची सृजनशीलता, वैचारिकतेसाठी वाचन संस्कृती जीवंत ठेवणे काळाची गरज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta