
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आह
पुणे प्रतिनिधी – कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून उद्यापासून जमावबंदीचा आदेश लागू असेल. 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू असेल. याबाबतचे आदेश पुणे शहर पोलिस सहायुक्त डॉक्टर रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.
कोरोनाला रोखण्यासाठी १४४ कलम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पोलिस आयुक्तालय हद्दीत जमावबंदी, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यास तसंच संचार करण्यास मनाई असे आदेश लागू केले आहेत. पुढचे दहा दिवस हे आदेश लागू राहणार असून याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पुणे शहर पोलिस सह आयुक्त डॉक्टर रविंद्र शिसवे यांनी दिला आहे.
सगळ्या प्रकाराने मात्र गणेश उत्सव समिती आणि. मंडळात गणपती बाप्पाचे दर्शन करणाऱ्या भक्तांना मात्र करुणा च्या नावाखाली त्रास सहन करावा लागणार आहे अशी चर्चा सध्या पुणे शहरात सुरू आहे



