vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

 नवी मुंबई परिसरात कुरपणे खुन करुन शरीराचे तुकडे वेगवेगळे ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केला,आरोपीतास एपीएमसी पोलीस ठाणेकडून ३६ तासांत शिताफीने अटक

नवी मुंबई परिसरात *कुरपणे खुन करुन शरीराचे तुकडे वेगवेगळे ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केला. आरोपीतास एपीएमसी पोलीस ठाणेकडून ३६ तासांत शिताफीने अटक* :

नवी मुंबई पोलिस दलातील एमपी एमसी पोलीस अधिकाऱ्यांनी तीन तासात खूनच्या  आरोपीला अटक केली

याबाबत सविस्तर माहिती अशी की  दिनांक १२/०९/२० २१ रोजी ०९-३० वा. चे पुर्वी, माथाडी चौक ते पुनीत कॉर्नरकडे जाणारे रोडवरील माथाडी चौकातून सुमारे ३०० मिटर अंतरावर उत्तरेस, धान्य मार्केटचे बाहेरील अंतर्गत रोडवरील वाहन पार्किंगमध्ये सेक्टर-१९, एपीएमसी, वाशी, नवी मुंबई येथे एका निळे. रंगाचे प्लॅस्टीकचे पिशवीत मानवी अवयव (दोन हाथ, दोन पाय व मांडी) मिळून आले होते.

कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात इसमाचा खुन करुन त्याचे मानवी अवयव एपीएमसी परिसरात पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने टाकले असल्याची खात्री झाल्याने दिनांक १२/०९/२०२१ रोजी एपीएमसी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क. ३३४ / २०२१, भादवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास सुरु करण्यात आला.

एपीएमसी पोलीस ठाण्याचे निरीक्षण :

मिळून आलेले मानवी अवयव हे कोणाचे आहेत याबाबत कोणतीही उपयुक्त माहिती उपलब्ध होत नव्हती. मयताची ओळख पटवून आरोपीचा शोध घेणे खुप कठीण असल्याने मिळून आलेले अवयवांचे बारकाईने सुक्ष्म निरीक्षण व परिक्षण केले असता मिळून आलेले अवयवांपैकी उजवे हातावर रविंद्र व हनुमानाचे चित्र गोंदलेले असल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीचे अनुषंगाने मिळुन आलेले मानवी अवयवांची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याकरीता गुन्हयाचे तपासकामी चार विशेष पथके स्थापन करण्यात आली. सदर पथके ठाणे, रायगड, मुंबई व नवी मुंबई परिसरात पाठवली होती.

एपीएमसी पोलीस ठाण्याची चार पथके :

नमुद पथकांकडून, गुप्त बातमीदारांना माहिती देवून तांत्रीक तपास करुन, ठाणे, मुंबई व नवी मुंबई आयुक्तालयातील पोलीस ठाणेकडील मिसींग अभिलेखाची पडताळणी

बातमीदारां मार्फतीने, सीसीटीव्ही कॅमेरॅची पाहणी करुन व तांत्रीक तपासाव्दारे तपास करुन संशयीत इसम नामे

सुमीतकुमार हरिषकुमार चौहान, वय-२७ वर्षे, राह. सेक्टर-१२ डी, कोपरखैराणे, नवी मुंबई, मुळ राह. बदायु, उत्तर प्रदेश यास गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात आले.

आरोपीताने कुरपणे केलेला खुन व गुन्हा उघड केलेबाबत :

नमुद संशयीत आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्याने त्याचा दुरचा नातेवाईक रवि उर्फ रविंद्र रमेश मंडोटीया, वय-३० वर्षे याचेसोबत असलेल्या पैशांचा व्यवहार व जुन्या भांडणाचा राग मनात धरुन दिनांक ०९/०९/२०२१ रोजी गळा चिरुन खुन करुन, त्याचे प्रेताचे वेगवेगळे तुकडे करुन त्यापैकी दोन हाथ, दोन पाय व मांडी हे मानवी अवयक एपीएमसी पोलीस ठाणे परिसरात व धड महापे परिसरा असे वेगवेगळया ठिकाणी टाकून पुरावा नष्ट केल्याची आरोपीने कबुली दिली आहे.

नमुद आरोपीकडे अधिक सखोल तपास करुन आरोपीने मयताचे पुरुन ठेवलेले मुंडके दोन पंच व माननिय कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार यांचे समक्ष उकरुन काढून पुढील कार्यवाहीकामी ताब्यात घेण्यात आले असुन, नमुद गुन्हयातील आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे व गुन्हयात वापरलेले हत्याराचा पोलीस तपास करीत आहेत.

आरोपीतास दिनांक १४/०९/२०२१ रोजी अटक करण्यात आली असुन, तो दिनांक २२/०९/२०२१ रोजी पर्यंत माननिय न्यायालयाच्या आदेशान्वये पोलीस कोठडी रिमांडमध्ये आहे.

गुन्हयाचे कारण व तपास :

नमुद आरोपी हा २७ वर्षे वयाचा आहे, त्याचे मयताशी मैत्रीचे संबंध होते. आर्थिक देवाण-घेवाण व जुन्या भांडणामधून आरोपीताने मयताचा दारु पाजून खुन केल्याचे निष्पन्न झालेले आहे. खुन केल्यानंतर पुरावे लपवण्यासाठी त्याने मयताच्या शरीराचे तीन हिश्यात तुकडे करुन तीन वेगवेगळया ठिकाणी टाकलेले होते. एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पथकाने अतिशय मेहनती

संबंधित पोस्ट

महादेव बेटिंग ॲप प्रकरण: अभिनेता साहिल खान फरार;

मुलीचे अपहरण आणि शोधमोहीमेचे थरारनाट्य, वयाच्या 7 व्या वर्षी हरवलेली पूजा, 9 वर्षांनी कुटुंबीयांना भेटली

vishwatmaklokswamivarta

प्रसिद्ध गायक पंजाब येथील सिद्धू मूसे वाला हत्याकांड मास्टरमाइंड सचिन बिश्नोई याला में, अजरबैजान येथून अटक..

vishwatmaklokswamivarta

तिहार जेलमध्ये गँगवार, तुरुंगात प्रतिस्पर्धी टोळीकडून टिल्लू ताजपुरियाची हत्या..

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर  महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई, 16.36 किलो सोने केले जप्त, दोघांना अटक…

vishwatmaklokswamivarta

कल्याणमध्ये  तिसगाव परिसरामध्ये एका 12 वर्षीय मुलीची निघ्रृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना पोलिसांची माहिती