vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

एमपीएससीकडून राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. उमेदवारांच्या मागणीचा विचार करून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 10 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत, तर ऑनलाइन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 13 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे

या परीक्षेद्वारे एकूण 5,707 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या शुद्धीपत्रकानुसार विविध मागण्यांचा समावेश करून पदसंख्या वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नसून, त्यांनी ‘My Account’ या पर्यायातून संबंधित माहिती अद्ययावत करावी, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच, आवश्यक कागदपत्रांची पडताळणी नियुक्तीपूर्वी करण्यात येणार असून, पात्रता सिद्ध न झाल्यास नियुक्तीस अपात्र ठरविण्यात येईल, असेही आयोगाने जाहिरातीत नमूद केले आहे. याबाबतचे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याचे आयोगामार्फत कळविण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांनो, काळजी करू नका … पिण्याच्या पाण्यासह चारा उपलब्ध करून देणार- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- जत तालुक्यातील कोळगिरी, व्हसपेठ व माडग्याळ येथे पिकांची पाहणी 

श्री रामाच्या जयघोषासह मंत्रोच्चारात सिंहस्थ कुंभमेळा ध्वजस्तंभ शिलान्यास पूजन सोहळा संपन्न सिंहस्थ कुंभमेळा २०२७ यशस्वी करण्यासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक-गिरीश महाजन

महिलांच्या हक्काचा विरोध करणाऱ्यांना जनता माफ करत नाही!” – पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लोकसभेत स्पष्टोक्ती 

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

करियर निवडीसाठी मानसशास्त्रीय मार्गदर्शन कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ