vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कथाकथन, सुलेखन, सांकेतिक भाषा आणि आर्थिक साक्षरतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कथाकथन, सुलेखन, सांकेतिक भाषा आणि आर्थिक साक्षरतेविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई, प्रतिनिधी: मुंबई पुस्तक महोत्सव २०२६ मध्ये आयोजित ‘चिल्ड्रन्स कॉर्नर’मध्ये शनिवारी विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, सुलेखन कार्यशाळा, सांकेतिक भाषा आणि आर्थिक साक्षरता अशा विविध विषयांवरील सत्रांचे आयोजन करण्यात आले. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसह मूकबधिर विद्यार्थ्यांनीही या उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

पहिल्या सत्रात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी कथाकथन सत्र आयोजित करण्यात आले. यावेळी रिटा राममूर्ती गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’चा इतिहास आणि त्यामागील संपूर्ण कथा सांगितली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’च्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची माहिती देण्यात आली.

दुसऱ्या सत्रात इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुलेखन कार्यशाळा घेण्यात आली. या सत्रात रोहित किरवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मराठी भाषेतील लेखन, अक्षरांचे वळण आणि सुलेखन याविषयी मार्गदर्शन केले.

तिसरे सत्र मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. ‘ट्रेनिंग अँड एज्युकेशनल सेंटर फॉर हिअरिंग इम्पेअर्ड’ (TEACH) यांच्या वतीने हे सत्र घेण्यात आले. यावेळी राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या पुस्तकांची माहिती सांकेतिक भाषेतून उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची माहिती एनसीसीएलचे संपादक दीप सैकिया यांनी दिली. या उपक्रमांतर्गत सुरुवातीला ५०० पुस्तकांचे सांकेतिक भाषेतील व्हिडिओ तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

चौथ्या सत्रात विद्यार्थ्यांसाठी ‘आर्थिक साक्षरतेविषयी जागरूकता’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या सत्रातून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार आणि आर्थिक साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.

0000

संबंधित पोस्ट

वाराणसी येथे ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल’च्या ९४ व्या उपक्रमाचं आयोजन

vishwatmaklokswamivarta

बनावट कागदपत्रांद्वारे जालन्यातील सर्व्हे ५५४ मधील 5 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न उघडकीस,न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक व दुय्यम निबंधकासह ५ जणांवर गुन्हा दाखल..

vishwatmaklokswamivarta

पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाबाहेर घडलेली गोळीबार आणि कोयत्याने हल्ला केल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. सुनेत्राताई अजित पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या एक्स अकाउंट वर असे म्हटले आहे

vishwatmaklokswamivarta

केंद्राच्या रेल्वे स्थायी समितीवर खासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती

खामगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय प्रस्तावित;१५ दिवसांत सूचना व हरकती नोंदविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

नाशिकच्या सप्तश्रृंगी गड ते नांदुरी मार्गावरील घाट रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हा मार्ग २९ सप्टेंबर पासून १ ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीसाठी बंद

vishwatmaklokswamivarta