vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

खेत बचाओ अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद१४८ गावांतील ५,५०० शेतकऱ्यांचा सहभाग

खेत बचाओ अभियानास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद१४८ गावांतील ५,५०० शेतकऱ्यांचा सहभाग

सातारा, प्रतिनिधी- कृषी विभागामार्फत जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढवणे, जलसंधारण आणि शाश्वत नैसर्गिक शेतीचा प्रसार करणे या मुख्य उद्देशाने देशव्यापी ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येत आह

कृषी विभागाच्यावतीने प्रकल्प संचालक ‘आत्मा’ अजय शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २२ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत १४९ जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्ह्यातील १४८ गावांमध्ये ५,५०० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

या अभियानांतर्गत कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रांच्या समन्वयाने माती परीक्षणावर आधारित पोषण व्यवस्थापन, पीक अवशेष व्यवस्थापन (पेंढा न जाळणे), एकात्मिक अन्नद्रव्य व कीड व्यवस्थापन, प्रति थेंब अधिक पीक, शेतकरी आयडी अद्ययावत करणे आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

         मोहिमेचा एक भाग म्हणून १८ नोव्हेंबर २०२६ रोजी मौजे गुळुंब ता. वाई येथील राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व खेत बचाओ अभियानाअंतर्गत आत्मा सातारा आणि कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय संस्था पातळीवरील शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर बंद करून नैसर्गिक शेतीकडे वळवणे, खेत बचाओ अभियानाचेमहत्त्व, सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठा निर्मिती याबाबत माहिती देऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले.

000

संबंधित पोस्ट

अधिकारी -‌ कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणातील सूचनांचे काटेकोरपणे पालन करत जबाबदारी दक्षतेने पार पाडावी – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जनगणना २०२७ संदर्भातील जिल्हास्तरीय प्रशिक्षणास प्रारंभ…

रायगड – रत्नागिरी – सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणूक**आजअखेर 6 उमेदवारांचे 12 नामनिर्देशन पत्रे दाखल ; मंगळवारी छाननी

समान नागरी कायद्याबाबत कोकण विभागात २१ व २२ नोव्हेंबरला जनसुनावणी**नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट, संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे – विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल*

vishwatmaklokswamivarta

📮 **डाक अदालत ९ मार्चला – तक्रारींसाठी संधी!**

ओजस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा 100% निकाल; प्राजक्ता गायकवाड प्रथम

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्ण