vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हा कारागृहात “दिवाळी पहाट” संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न..

जिल्हा कारागृहात “दिवाळी पहाट” संगीतमय कार्यक्रम उत्साहात संपन्न..

 

सातारा प्रतिनिधी:- जिल्हा कारागृहात ओम् एज्युकेशन सोसायटीच्या वतीने ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले. त्यामध्ये भावगीत, भक्तिगीत, देशभक्तीपर तसेच मराठी आणि हिंदी गीतांचे सादरीकरण करून उपस्थितांचे मनोरंजन करण्यात आले .

सदर उपक्रम हा मा. डॉ. सुहास वारके अपर पोलिस महासंचालक, महाराष्ट्र राज्य पुणे माननीय श्री योगेश देसाई, कारागृह महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे,

 श्री सुनील ढमाळ कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन कारागृह अधीक्षक मा. श्री. ब्रह्मदेव लटपटे यांनी केले. कारागृह विभाग व ओम एज्युकेशन सोसायटी साताऱ्याच्या श्रीमती स्वरूपा पोरे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. सप्तसूर सांगीतिक संस्थेचे श्री सुनील भोजने ,श्री चंद्रशेखर बोकील, सौ रेवती बंड ,सौ श्रुती शहा व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातारा जिल्हा कारागृहात येवून बंद्यांसाठी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केला. यात काही बंद्यांनी सहभाग घेत गाणी गायली. कारागृहातील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील कारागृहाच्या सुरक्षिततेची जबाबदारी सांभाळून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

00000

संबंधित पोस्ट

महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 25 जूनला लोकअदालतीचे आयोजन- अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर

शेतकऱ्यांनी कर्जखात्याला ‘आधार’ संलग्न करावे सहकार विभागाचे आवाहन.

ऋणानुबंध वधू-वर सूचक मंडळाच्या बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद!

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय कला प्रदर्शनात महाराष्ट्राच्या तीन कलाकारांचा गौरव रमेश थोरात, सिद्धार्थ शिंगाडे व प्रितम देवसकर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

vishwatmaklokswamivarta

दिल्लीत जंतरमंतर  होणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे

पनवेल येथे दुचाकी वाहनांसाठी MH46DH ही नवीन मालिका,पसंतीच्या क्रमांकासाठी अर्ज सादर करावेत