vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची रेवगाव येथे क्षेत्रभेट; विविध उपक्रमांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद

जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांची रेवगाव येथे क्षेत्रभेट; विविध उपक्रमांची पाहणी व ग्रामस्थांशी संवाद

जालना, प्रतिनिधी : जालना तालूक्यातील रेवगाव येथे जिल्हाधिकारी अशिमा मित्तल यांनी आज क्षेत्रभेट देऊन गावातील विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रारंभिक बालविकास (ECD) उपक्रमांतर्गत सहभागी मातांच्या घरी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला तसेच अंगणवाडी केंद्राला भेट देऊन माता, अंगणवाडी सेविका व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून उपक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

यावेळी मातांचे मानसिक आरोग्य, स्तनपान, बालसंगोपन आणि कुटुंबातील सदस्यांचा सहभाग या विषयांवर चर्चा करण्यात आली. उपक्रमामुळे मातांना मिळणारा भावनिक आधार, गृहभेटींच्या माध्यमातून होणारे मार्गदर्शन आणि कुटुंबपातळीवर होत असलेले सकारात्मक बदल याबाबत माहिती घेण्यात आली.

तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी स्वामी समर्थ केंद्र, आरोग्य उपकेंद्र आणि प्रगतिशील शेतकरी अनिल पारखे यांच्या शेतीला भेट देऊन तेथील उपक्रमांची पाहणी केली. शेती, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात स्थानिक पातळीवर राबविण्यात येणाऱ्या विविध प्रयत्नांची त्यांनी माहिती घेतली.

या क्षेत्र भेटीदरम्यान जिल्हाधिकारी मित्तल यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या. विविध शासकीय उपक्रमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी, नागरिकांचा सहभाग आणि स्थानिक पातळीवरील सकारात्मक बदल यांचा आढावा घेणे हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी माता, पिता आणि संपूर्ण कुटुंबाला सक्षम करणे, तसेच ग्रामविकासासाठी स्थानिक पातळीवरील चांगल्या उपक्रमांना प्रोत्साहन देणे, या दृष्टीने ही क्षेत्रभेट महत्त्वपूर्ण ठरली

****

संबंधित पोस्ट

भारताच्या हरित रेल्वे प्रवासात ऐतिहासिक टप्पा! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला

जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ संपन्नसेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज-महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta

💧 टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी सर्वंकष कार्यपद्धती निश्चित! जिल्हास्तरीय समिती करणार संनियंत्रण व प्रत्यक्ष पाहणी

vishwatmaklokswamivarta

हवामान विभागाचा इशारा! उत्तर भारतासह विदर्भात पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’; वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता …