vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात 74 टँकरव्दारे 66 गावे, 479 वाड्यातील एक लाख 43 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

जिल्ह्यात 74 टँकरव्दारे 66 गावे, 479 वाड्यातील एक लाख 43 हजाराहून अधिक बाधित लोकसंख्येला पाणीपुरवठा

        सांगली, द प्रतिनिधी : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगलीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची टंचाई निवारणासाठी टँकर व विहीर अधिग्रहणाद्वारे प्रशासनाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. बाधित गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे तसेच स्थानिक पातळीवर खाजगी विहिरी व बोअरचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषदेच्या 17 नोव्हेंबर अखेरच्या अहवालानुसार 66 खाजगी व 8 शासकीय अशा एकूण 74 टँकरव्दारे 66 गावे व 479 वाड्यातील 1 लाख 43 हजार 888 बाधित लोकसंख्येला व 97 हजार 434 पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी 30 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित केल्या आहेत.

      जत तालुक्यातील टंचाईग्रस्त 57 गावे व 414 वाड्यांमधील सुमारे 1 लाख 24 हजार, 867 लोकसंख्येला आणि 81 हजार 222 पशुधनाला 64 टँकरद्वारे (57 खाजगी व 7 शासकीय) पाणी पुरवले जात आहे. टंचाईवर मात करण्यासाठी तालुक्यात 18 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या असून 4 डिझेल इंजिन भाड्याने घेण्यात आले आहेत

        कवठेमहांकाळ तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 8 वाड्यांमधील 1834 लोकसंख्येसाठी 1 शासकीय टँकर सुरू आहे. नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्यामुळे गावात पाणीटंचाई भासू नये यासाठी 2 खाजगी विहिरी/बोअरचे अधिग्रहण करण्यात आले आहे. तासगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त 1 गाव व 6 वाड्यांमधील 855 लोकसंख्येला 1 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. तालुक्यात 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.        आटपाडी तालुक्यातील टंचाईग्रस्त 7 गावे व 51 वाड्यांमधील 16332 नागरिकांना आणि 16212 पशुधनाला 8 खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. या तालुक्यात 4 विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत       खानापूर तालुक्यात 2 गावे टंचाईग्रस्त असून 3 खाजगी विहिरी/बोअर अधिग्रहित करण्यात आले आहेत.

0000

संबंधित पोस्ट

दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार

संघर्ष, समन्वय आणि आंबेडकरी विचारांचे प्रभावी नेतृत्व म्हणजे रामदास आठवले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय राज्यमंत्रीपदी १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवले यांचा नागरी सत्कार

बजाज पुणे ग्रँड टूर’ स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरुवात पुणे जिल्ह्याने खेळाला दिले प्राधान्य; स्पर्धेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद – उपमुख्यमंत्री

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित जातीसाठी मोफत तांत्रिक उद्योजकता प्रशिक्षण*’बार्टी’ आणि ‘एमसीईडी’चा संयुक्त उपक्रम

पद्मश्री डॉ. मुकेश बत्रांच्या 58 व्या छायाचित्रण प्रदर्शनासाठी झायेद खान आणि मंदिरा बेदी यांनी भरघोस उद्घाटन केले 

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांच्या कायम पाठीशी राहू- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta