vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी मिरज आगारातून जादा बसेस

दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणाऱ्यांसाठी मिरज आगारातून जादा बसेस

 

सांगली, प्रतिनिधी : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मिरज आगाराने विशेष नियोजन केले आहे. दि. 1 ते 22 नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी मिरज आगारातून विविध मार्गांवर ३२ जादा फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जादा बससेवेचा लाभ घेताना नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनी उपलब्ध आरक्षण सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मिरज आगार प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मिरज-पुणे, मिरज-छत्रपती संभाजीनगर, मिरज-नांदेड, मिरज-लातूर, मिरज-तुळजापूर आणि मिरज-नाशिक या मार्गांवर जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गावरही जादा वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगराला मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी अति मुसळधार पावसाचा (Orange Alert) इशारा दिला आहे, तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असाही इशारा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांनी संवाद व मुक्काम; शेतकऱ्यांवर ओढवलेले संकट दूर करण्याचा विश्वास

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र दालनाच्या माध्यमातून राज्यातील वस्त्रोद्योगाला जागतिक स्तरावर चालना – निवासी आयुक्त श्वेता सिंघल

चांडोळ येथे कृषी मालासाठी उपबाजार घोषित; बुलढाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील ५० गावांचा समावेश..

डाक विभागाच्या आउटलेटसाठी प्रस्ताव मागविले

वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला

vishwatmaklokswamivarta