vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 149 समुहांचा उदंड प्रतिसाद

‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धेमध्ये 149 समुहांचा उदंड प्रतिसाद

 

       नवी मुंबई प्रतिनिधी   दिवाळीत बाळगोपाळांमार्फत बनविल्या जाणा-या किल्यांच्या परंपरेला परंपरेला प्रोत्साहित करण्यासाठी आणि त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि स्वराज्याची प्रेरणा मनामनात रुजविण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिवाळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘नवी मुंबई महापौर चषक किल्ले बांधणी स्पर्धा २०२६-२७’ मध्ये तब्बल 149 समुहांनी सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

          या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाचे जतन, दुर्गसंवर्धनाविषयी जनजागृती तसेच विशेषत्वाने लहान मुले आणि युवकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे उद्देश साध्य झाल्याचे समाधान महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी व्यक्त केले.

          स्पर्धेतील शालेय गटात 26 तसेच खुल्या गटात 123 अशाप्रकारे 149 समुहांनी उत्साही सहभाग घेतला. अर्ज नोंदणी करून सहभागी झालेल्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 149 किल्ले बांधणीच्या ठिकाणी परीक्षक जे.जे.स्कुल ऑफ आर्ट्सचे इतिहासप्रेमी फाईन आर्ट कलावंत श्री.शिवम घोडजकर आणि प्रशांत धाडवे यांनी प्रत्यक्ष भेट देत प्राथमिक परीक्षण केले. या प्रत्यक्ष भेटीत त्यांनी किल्लेबांधणी, त्याची रचना, त्यामधील रेखीवपणा याची पाहणी केली असून मुलांकडून किल्ल्याविषयीची माहितीही सादरीकरणातून जाणून घेतली. या सर्व किल्ल्यांचे व सादरीकरणाचे महानगरपालिकेमार्फत छायाचित्रण आणि छायाचित्रीकरण करण्यात आलेले आहे.

          या प्राथमिक फेरीतून शालेय गटात 6 व खुल्या गटात 19 किल्ल्यांची निवड अंतिम फेरीसाठी करण्यात आलेली असून अंतिम फेरीच्या परीक्षणानंतर उत्कृष्ट 3 व उत्तेजनार्थ 3 किल्ल्यांना व आकर्षक रोख पारितोषिके स्मृतीचिन्हासह प्रदान करण्यात येणार आहेत.

          खुल्या गटात प्रथम क्रमांकासाठी रु. 30 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रु. 20 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी रु. 10 हजार अशी 3 पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच शालेय गटात प्रथम क्रमांकासाठी रु. 20 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रु. 15 हजार आणि तृतीय क्रमांकासाठी रु. 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. याशिवाय दोन्ही गटांमध्ये प्रत्येकी 3 उत्तेजनार्थ पारितोषिके रु. 5 हजार प्रमाणे देण्यात येणार आहेत.

          महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री. गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती श्री. राजू भालचंद्र मढवी आणि समितीच्या सर्व सदस्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या सणानिमित्त अंगणात किल्ले उभारण्याची परंपरा जपत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाचा जागर करण्या-या आणि हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणा-या या अभिनव उपक्रमामध्ये 149 समुहांनी उत्साहाने सहभागी होत हा उपक्रम यशस्वी केला.

 

संबंधित पोस्ट

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व महाआवास अभियानांत ठाणे जिल्ह्याची उल्लेखनीय कामगिरी

केरोसीनचे टँकर प्राप्त झाले आहे. गोदाम व्यवस्थापकाच्या उपस्थितीत 12 हजार लिटर केरोसीन 124 परवानाधारकास वितरित

महावीर जयंतीनिमित्त ३१ मार्च रोजी जिल्ह्यात कत्तलखाने व मांसविक्री बंद ठेवण्याचे आदेश

व्हीबीजी रामजी योजनेतून बांबू लागवडीसाठी अडीच एकर क्षेत्राला ७ लाखांचे अनुदान; बांबू उद्योगातून शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधावी रायगडमध्ये बांबू उद्योगाचे आदर्श मॉडेल  –पालकमंत्री भरतशेठ गोगावले ग्रीन केन बांबू क्लस्टरच्या सामाईक सुविधा केंद्राचे शिरगाव येथे थाटात भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यात 19 मार्च रोजी ‘यलो अलर्ट’ नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू