vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

बिडी कामगारांच्या किमान वेतनवाढीबाबत उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, प्रतिनिधी बिडी कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न गांभीर्याने घेतला पाहिजे. कामगारांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून असल्याने त्यांना योग्य न्याय मिळावा, तसेच त्यांच्या किमान वेतनात वाढ करण्याबाबत या क्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी केले
बिडी कामगारांच्या किमान वेतन व महागाई भत्त्याच्या प्रश्नासंदर्भात कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बीकेसी येथील कामगार भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीस कामगार विभागाचे उपसचिव दिपक पोकळे, तसेच संबंधित अधिकारी, मालक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी बिडी कामगारांना किमान वेतनासोबत महागाई भत्ता देण्यात यावा, अशी मागणी केल
मालक प्रतिनिधींनी या संदर्भातील आपले सविस्तर निवेदन शासनाकडे सादर करावे, असे सांगत कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर म्हणाले, प्राप्त निवेदनाचा विचार करून शासनस्तरावर पुढील निर्णय घेण्यात येईल. बिडी कामगारांच्या किमान वेतनाबाबत सर्व संबंधित घटकांच्या भूमिका विचारात घेऊन न्याय्य व समतोल निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. असेही ते म्हणाले.

 

0000

संबंधित पोस्ट

पाणी व चारा टंचाई निवारणासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव चारा लागवड, मुरघास निर्मिती आणि जलसंधारणाच्या कामांचे सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकायुक्त संस्थेच्या अध्यक्षपदाची निवृत्त न्यायमूर्ती श्री. सुनील बाळकृष्ण शुक्रे यांचा शपथविधी आज लोकभवन, मुंबई येथे पार पडला

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

विशेष लेख….पनवेल महानगरपालिका राज्यात अव्वल : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी*

जिल्ह्यातील तृतीयपंथी व्यक्तींना बीज भांडवल कर्ज योजनेंतर्गत अर्ज सादर करावेत

नवीकरणीय ऊर्जेतील कामगिरीसाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय पुरस्कार सर्वसाधारण श्रेणीत देशात दुसरा क्रमांक, उपराष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

vishwatmaklokswamivarta