vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक दस्तऐवजांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे, प्रतिनिधी : भारत इतिहास संशोधक मंडळाच्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या डिजिटायझेशन प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मुरकुंबी इतिहास उपक्रमाचे नरेंद्र मुरकुंबी, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, सचिव पांडुरंग बलकवडे, कोषाध्यक्ष नंदकुमार निकम, पांडुरंग बलकवडे उपस्थित होते. भारत इतिहास संशोधक मंडळ गेल्या ११६ वर्षांपासून इतिहास संशोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करीत आहे. मंडळाकडे जतन केलेल्या ऐतिहासिक कागदपत्रांच्या माध्यमातून मराठ्यांचा गौरवशाली इतिहास जगासमोर आणण्याच्या उद्देशाने हा डिजिटायझेशन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत २०२१ मध्ये या प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यातील पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.या प्रकल्पामुळे www.bismarchives.in या संकेतस्थळावर दुर्मिळ ऐतिहासिक कागदपत्रे तसेच अमूल्य वस्तूंची सचित्र माहिती उपलब्ध होणार आहे. मंडळाकडे सुमारे तीन लाख कागदपत्रे असून, त्यांची सुमारे साडेसहा लाख पृष्ठप्रतिमा (इमेजेस) टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार ऐतिहासिक कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत.

यामध्ये बखरी, मुघल फर्माने, हस्तलिखिते, ताम्रपट, चित्रे, नकाशे, शिल्पे, शस्त्रे, शिलालेख, भूमिपत्रे आणि दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे. या माध्यमातून भारतीय इतिहासातील दुर्मिळ आणि महत्वपूर्ण माहिती जागतिक स्तरावर अभ्यासक, संशोधक आणि इतिहासप्रेमींसाठी उपलब्ध होणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत यांनी सांगितले. या डिजिटायझेशन प्रकल्पाचे काम चिन्मय भंडारी आणि मिथिलेश कुळकर्णी यांच्या न्यानसा कंपनीने माईंडस्केप हबच्या सहकार्याने पूर्ण केले आहे. प्रकल्पासाठी मुरकुंबी इतिहास उपक्रम आणि भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर यांचेही सहकार्य लाभले आहे.

 

0000

 

संबंधित पोस्ट

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षेच्या पहिल्या दिवशी 6 जिल्हयातील 13 केंद्रांवर परीक्षा प्रक्रीया सुव्यस्थित संपन्न

कोकण विभागीय माहिती कार्यालला मिळाले नवे उपसंचालक*संजू उत्तम चव्हाण यांनी स्वीकारला कोकण विभागीय उपसंचालक (माहिती) पदाचा कार्यभार*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सीपीआर रुग्णालयाच्या नूतनीकरण कामांचे लोकार्पण… ऐतिहासिक वारसास्थळाचे जतन करत अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा विस्तार; ६०० कोटी रुपयांहून अधिक निधीतून विविध कामे…

दिव्यांगांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे

३० जूनपर्यंत HSRP नंबर प्लेट बसवा; १ जुलैपासून नियमभंग करणाऱ्यांवर पोलिस आणि परिवहन अधिकाऱ्यांकडून कडक कारवाई

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..