vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महावितरणचा वीजचोरांना दणका! राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून पर्दाफाश..

महावितरणचा वीजचोरांना दणका! राज्यभरात तीन दिवसात 250 वीजचोरीची प्रकरणे उघड6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून पर्दाफाश..

ठाणे, प्रतिनिधी:- महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाने राज्यात अवघ्या तिनच दिवसात राबविलेल्या वीज चोरी मोहीमेत वीज चोरी व अनधिकृत वीज वापराची 250 प्रकरणे उघडकीस आली आहेत. या कारवाईत 6 कोटी 27 लाख रुपयांच्या वीजचोरीचा पर्दाफाश करण्यात आला असून कारवाईमुळे वीज चोरांचे धाबे दणाणले आहे.

    वीजचोरी आणि महसूल गळती रोखण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. राज्यातील कोकण, पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या प्रादेशिक परिक्षेत्रात सुरक्षा व अंमलबजावणी विभागाकडून तपासणी करण्यात आली. यामध्ये कोकण प्रादेशिक विभागात 53, पुणे 73, छत्रपती संभाजीनगर 56 आणि नागपूर प्रादेशिक विभागात 68 अशा एकूण 250 वीजचोरीची प्रकरणे उघडकीस आली. वीज चोरी प्रकरणांचे मुल्यांकन झाले असून 6 कोटी 27 लाख रूपयांच्या वीज चोरीचे बिल संबंधित ग्राहकांना देण्यात आले आहे. वीज चोरीचे देयक व दंडाचा भरणा न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

        या मोहिमेत 240 ग्राहकांविरुद्ध विदयुत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. तर कलम 126 नुसार अनधिकृत वीज वापर प्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वीजचोरीचे देयक व दंडाच्या रकमेचा विहित मुदतीत भरणा न करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी फिर्याद देण्यात येणार आहे. वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंड व तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. सध्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी सुरू आहे. वीज ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेवूनच विजेचा वापर करण्याचे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व सुरक्षा व अंमलबजावणी विभागाच्या कार्यकारी संचालक अपर्णा गिते यांनी केले आहे.

 

00000000

संबंधित पोस्ट

मुंबई लोकल ट्रेनमधील हत्येचा उलगडा: २४ तासांच्या आत आरोपीला अटक

vishwatmaklokswamivarta

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 135 व्या जयंतीच्या शासनातर्फे करण्यात येणा-या पूर्वतयारीचा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतला आढावा

एसआयआर कार्यक्रमाचा केंद्रीय उप निवडणूक आयुक्तांकडून आढावा* *मतदार यादीची अचूकता, बीएलओच्या कामाचे नियमित परीक्षण आणि कालमर्यादेचे काटेकोर पालन करावे* – *उप निवडणूक आयुक्त ग्यानेश भारती*

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

मुंबईत सार्वत्रिक पारशी नोंदणी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

vishwatmaklokswamivarta