vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारण व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार ;एचडीएफसी बँकेच्या निधीतून जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धी उपक्रम राबविणार

शाश्वत विकासासाठी मृद व जलसंधारण व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट यांच्यात सामंजस्य करार ;एचडीएफसी बँकेच्या निधीतून जलसुरक्षा, पाणलोट विकास, हवामानपूरक शेती व उपजीविका वृद्धी उपक्रम राबविणार

बुलढाणा, प्रतिनिधी : बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात सर्वांगीण, शाश्वत आणि सर्वसमावेशक ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी जिल्हा प्रशासन व वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारांतर्गत विविध विकास प्रकल्पांसाठी एचडीएफसी बँकेमार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून, वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या माध्यमातून प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे

जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या उपक्रमासाठी आमदार श्वेता महाले यांचे सहकार्य लाभले आहे.

या प्रकल्पांतर्गत जलसुरक्षा, एकात्मिक पाणलोट विकास, नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन, हवामान बदलास अनुकूल शेतीपद्धती, उपजीविका वृद्धी, स्थानिक संस्थांचे बळकटीकरण आणि ‘जल तारा’ या उपक्रमांवर विशेष भर देण्यात येणार आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती, उपलब्ध नैसर्गिक संसाधने आणि स्थानिक समुदायांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांचे नियोजन व अंमलबजावणी केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांशी या उपक्रमांची सांगड घालून उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. ग्रामस्तरावरील संस्थांची क्षमता वाढविणे, जलस्रोत व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, हवामानपूरक शेतीपद्धतींचा प्रसार आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करण्यासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग घेतला जाणार आहे.

या प्रसंगी मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता यतीन कोठावळे, वरिष्ठ अभियंता निखिल धाडवे तसेच एचडीएफसी बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते. या कामासाठी मृद व जलसंधारण उपविभाग, चिखलीचे उपअभियंता शुभम चांदा व कनिष्ठ अभियंता मनोज देठे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जिल्हा प्रशासनाचा समन्वय, एचडीएफसी बँकेचे आर्थिक सहकार्य आणि WOTR चे तांत्रिक ज्ञान व प्रकल्प अंमलबजावणीचा अनुभव यांच्या समन्वयातून चिखली तालुक्यात शाश्वत विकास उपक्रमांना गती मिळणार आहे. लोकसहभागातून जलसंधारण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि ग्रामीण भागातील उपजीविका बळकट करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0000

संबंधित पोस्ट

आषाढी एकादशीसाठी पंढरपूरसाठी 254 जादा बसेस…

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना; महाबोधी गयामंदिर : बिहार हे तिर्थक्षेत्र निश्चित ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेण्यासाठी २२ मे पर्यत अर्ज सादर करावा

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हा वार्षिक योजना सन 2026 -2027 साठी 547.97 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता विकासकामांना गती, निधीचा प्रभावी वापर आणि वेळेत अंमलबजावणीवर भर

लातूरमध्ये ७ जून रोजी ‘संडे ऑन सायकल’ मोहिमेचे आयोजन

भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नांदेड प्रशासन सतर्क जिल्ह्यात जीवित व वित्तहानी नाही नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री अतुल सावे