vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

सुपा येथे शिवतीर्थ चौक सुशोभीकरण, पाणंद रस्ते कामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

अहिल्यानगर, प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील सुपा येथे पर्यटन विकास अंतर्गत शिवतीर्थ चौक सुशोभीकरण काम तसेच सुपा गावठाणांतर्गत तीन पाणंद रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी आमदार काशिनाथ दाते, उपविभागीय अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील शहरांचा विकास हा राज्य शासनाच्या प्राधान्यक्रमात असून नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामे गुणवत्तापूर्ण व नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात यावीत.

४० लाख रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांमुळे परिसराच्या विकासाला गती मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांसांगितले.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा लातूर दौरा

परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा आवश्यक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या नव्या पर्वाकडे आदिवासी समाजाची वाटचाल– प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळा;प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सुमारे तीन हजार कोटींच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन,आदिवासी संस्कृती आणि अस्मिता जपत सर्वसमावेशक विकास साधावा– राज्यपाल जिष्णू देव वर्मा,गडचिरोली महाराष्ट्राच्या विकासात पहिला जिल्हा बनेल– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे*

हर घर संत रविदास विचार-विकसित महाराष्ट्र’विशेष अभियान राज्यात व्यापक स्वरूपात राबवा-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- संत रविदास महाराजांच्या ६५० व्या जयंती वर्षानिमित्त राज्यस्तरीय मुख्य कार्यक्रम नाशिक येथे होणार

vishwatmaklokswamivarta