vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हे

महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! बॉस स्कॅममधील २ कोटींच्या फसवणुकीपैकी तब्बल १ कोटी ८१ लाख रुपये कंपनीला परत; महिनाभरात ९० टक्क्यांहून अधिक रक्कम रिकव्हर!**

 **महाराष्ट्र सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! बॉस स्कॅममधील २ कोटींच्या फसवणुकीपैकी तब्बल १ कोटी ८१ लाख रुपये कंपनीला परत; महिनाभरात ९० टक्क्यांहून अधिक रक्कम रिकव्हर!**

 नवी*मुंबई  प्रतिनिधी-सायबर गुन्हेगारांनी वरिष्ठ कंपनी अधिकाऱ्यांचे रूप धारण करून केलेल्या तब्बल २ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या मुंबईतील कंपनीला तब्बल १ कोटी ८१ लाख ४४६ रुपये परत मिळवून देण्यात आले आहेत. गुन्हा घडल्यापासून अवघ्या महिन्याभरात ९० टक्क्यांहून अधिक रक्कम परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.

**नेमकी कशी झाली फसवणूक?**दिनांक २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हा प्रकार घडला. सायबर भामट्यांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कंपनीच्या महत्त्वाच्या कामाचे कारण पुढे करून कर्मचाऱ्यांकडून मोठ्या रकमेचे बँक खात्यांमध्ये हस्तांतरण करून घेतले. अशा प्रकारे मुंबईतील एका कंपनीच्या बँक खात्यातून तब्बल २ कोटी रुपये परस्पर वळवण्यात आले.

**महाराष्ट्र सायबरची तातडीने कारवाई!**या प्रकरणी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६/२०२६ नोंदवण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(२), ३१९(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रार प्राप्त होताच महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्यासाठी विविध बँका आणि वित्तीय संस्थांशी संपर्क साधण्यात आला. फसवणुकीची रक्कम गोठविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.**न्यायालयाच्या आदेशानंतर १.८१ कोटी रुपये परत!**दिनांक २३ नोव्हेंबर २०२६ रोजी मा. न्यायालयाच्या आदेशानंतर १ कोटी ८१ लाख ४४६ रुपये संबंधित कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा जमा करण्यात आले. त्यामुळे सायबर आर्थिक फसवणुकीचा मोठा फटका बसलेल्या कंपनीला दिलासा मिळाला आहे.**महाराष्ट्र सायबर पोलिसांचे नागरिकांना आवाहन**कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या नावाने पैशांच्या हस्तांतरणासंबंधी सूचना प्राप्त झाल्यास, अधिकृत माध्यमातून त्यांची खात्री केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये

सायबर फसवणूक झाल्यास तातडीने www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा किंवा १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.महाराष्ट्र सायबरचे मुख्यालय नवी मुंबईतील महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये आहे.**सायबर गुन्हेगारीपासून सावध राहा, सतर्क राहा आणि आर्थिक व्यवहार करताना ख

संबंधित पोस्ट

ऑपरेशन रेजपिल एनसीबीने आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करीचे मोठे जाळे केले उद्ध्वस्त; भारतामध्ये पहिल्यांदाच, पश्चिम आशियात वापरल्या जाणाऱ्या ‘कॅप्टागॉन’ या सायकोट्रॉपिक पदार्थाची जप्तीची कारवाई

गडचिरोली पोलीस आणि सिआरपीएफ यांच्या माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सात जहाल माओवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलीस दलास यश

vishwatmaklokswamivarta

हातभट्टी निर्मिती विरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत ठाणे राज्य उत्पादन शुल्क सी विभागाची धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

खासगी आस्थापनांमध्ये बाल व किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्याच्या कारवाईत एकूण १ कोटीहून अधिक रुपयाचा मुद्देमाल जप्त -अतुल कानडे

ठाणे जिल्ह्यात मुंब्रा परिसरात १ कोटी ३० लाख रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केली असून या प्रकरणी एकाला अटक 

vishwatmaklokswamivarta