नाशिक रेल्वे स्थानकावर करोडो रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त; छठपूजेपूर्वी RPF ची मोठी कारवाई!
राज्य प्रतिनिधी
नाशिक : छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) नाशिक रोड रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडून तब्बल ₹1,48,64,000 इतकी बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.
ही कारवाई विशेष सुरक्षा मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘ऑपरेशन सतर्क’ अंतर्गत करण्यात आली. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवर सुरक्षा तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 22112 अमृत भारत एक्स्प्रेसच्या विशेष तपासणीदरम्यान प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बॅग घेऊन जात असलेल्या एका तरुणावर RPF जवानांना संशय आला. त्यानंतर जवानांनी त्याला थांबवून त्याची चौकशी केली तसेच बॅगेची तपासणी केली.