vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार;मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू होणार;मतदारांनी बीएलओ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन

लातूर, प्रतिनिधी : भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्ह्यात मतदार यादीचा सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम लवकरच सुरू होत आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे महत्त्वाचे कामे सुरू झाली असून, मतदारांना सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे यांनी केले आहे

या अनुषंगाने १) Blurr Photo (धूसर किंवा अस्पष्ट छायाचित्र दुरुस्त करणे), २) DSE (Demographically Similar Entries – समान लोकसंख्याशास्त्रीय नोंदी तपासणी व दुरुस्ती), ३) SIR Mapping (मतदारांचे २००२ च्या मतदार यादीशी नकाशा संलग्नीकरण/मॅपिंग) आणि Book a Call (BLO सोबत कॉल बुकिंग) इत्यादी कामे तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे. हे कामे प्रत्येक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (Booth Level Officer – BLO) यांनी आपल्या नेमणुकीच्या क्षेत्रातील मतदारांना समक्ष भेटून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

२३५ लातूर शहर विधानसभा मतदार संघ आणि २३४ लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांनी आपल्या रहिवासी मतदान केंद्रातील बीएलओ यांच्याशी समक्ष भेट घेऊन वरील कामे पूर्ण करून घ्यावीत. याशिवाय मतदार नावातील दुरुस्ती, वगळणी (Deletion) किंवा इतर आवश्यक बदलांसाठीही बीएलओ यांच्याकडे संपर्क साधावा. SIR Mapping चे काम २१ मार्च २०२६ नंतरही सुरू राहणार आहे. २००२ च्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://voters.eci.gov.in/searchInSIR/S2UA4DPDF-JK4QWODSE या अधिकृत लिंकचा वापर करावा. मतदारांनी मतदार यादीच्या या सखोल पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक राहण्यास मदत करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे-विरोळे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.

****

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘पुस्तकांची दिवाळी’उपक्रमाला वाचनप्रेमी नागरिकांचा उत्साही प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

ओबीसी आश्रमशाळांमधून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्या – मंत्री अतुल सावे

पश्चिम आशियातील युद्धामुळे #एलपीजीगॅस च्या जागतिक तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर-महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच-राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात’लेखापरीक्षक नेमणूकीसाठी निविदा सादर करण्‍याची मुदत 16 मे पर्यंत

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी ‘समाधान समारोह’ विशेष लोक अदालत वादांचे सलोख्याने निराकरण करण्यासाठी पक्षकारांना सहभागाचे आवाहन

जालना महसूल योजना महात्म्य छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न यावेळी दीप प्रज्वलन करताना खासदार कल्याण काळे आमदार अर्जुनराव खोतकर महापौरवंदनामध्ये उपमहापौर राजेश राऊत भास्कर आबा दानवे जिल्हाधिकारी अशीवामित्त रामदास दौंड जालन्यात महसूल योजनांचा महाकुंभ; ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आज रोजी सांगता झाली असून शिबिर संपन्न