vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकारक

राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकारक..

राज्य प्रतिनिधी-राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी बंधनकार#विधानसभाप्रश्नोत्तरे,राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत #मराठीभाषा शिकविणे बंधनकारक आहे. #मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर एक लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचे पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल, असे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले

मराठी भाषा सक्तीचा कायदा लागू करण्यात आल्याने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकविणे अनिवार्य आहे. मराठी विषय शिकविण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले शिक्षक नियुक्त करणेही शाळांसाठी बंधनकारक केले आहे. त्यामुळे शाळा तपासणी व भेटीदरम्यान मराठी विषयाच्या अध्यापनाची तसेच प्रत्येक वर्गातील मराठी परीक्षेची पडताळणी केली जाणार असल्याचे माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

#विधानसभाप्रश्नोत्तरे,यश विद्यानिकेतन या वसई येथील शैक्षणिक संस्थेने शासनाची परवानगी न घेता शाळेचे स्थलांतर केल्याचे निदर्शनास आले असून या प्रकरणी संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येईल. तसेच #शिक्षणहक्क कायदा (#आरटीई) अंतर्गत क्षेत्रभेट न देता शाळांची नोंदणी करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारणे दाखवा नोटीस बजावून प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले

0000

संबंधित पोस्ट

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार : पालकमंत्री अतुल सावे शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी

रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.-  सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लाभ घेण्याचे आवाहन

कोकण-घाट भागात मुसळधार पावसाचा अंदाज; पुणे विभागात सतर्कतेचा इशारा

अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती निमित्त पाहेगावात विविध उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद” – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांचे मार्गदर्शन” 

आंतरजातीय विवाह केलेल्या १४० जोडप्यांना अनुदान वितरीत