vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात SIR अंतर्गत अपर जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी

नांदेड, प्रतिनिधी: विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज अपर जिल्हाधिकारी नांदेड डॉ. रत्नदीप गायकवाड यांनी 87 नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सोमेश कॉलनी परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली

यावेळी त्यांनी मतदारांच्या घरी भेट देऊन मतदार गणना फॉर्म स्वतः भरून घेतले तसेच फॉर्मचे प्रत्यक्ष डिजिटायझेशन करून संपूर्ण प्रक्रियेची पाहणी केली. SIR अभियान प्रभावीपणे व पारदर्शक पद्धतीने राबविण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या

या पाहणीदरम्यान तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी संजय वारकड, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपायुक्त, महानगरपालिका नितीन गाढवे उपस्थित होते.यावेळी सोमेश कॉलनी येथील मतदार सुभाषचंद्र लीलाधर शहा तसेच मतदार सौ. श्वेता सुनीलराव वट्टमवार यांनी मतदार गणना प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

पाहणीदरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ एम. एच. पवार, साहेबराव पांडुरंग जाधव तसेच बीएलओ पर्यवेक्षक श्री. ब्याले यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे संघटीत राहणे गरजेचे – शंकर बाईत,पती नसलेल्या स्त्रीयांना धार्मिक कार्यक्रमात सन्मानपूर्वक वागणूक देण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या नियुक्त्यांची आज घोषणा*

मातोश्री शासकीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 31 जुलैची मुदत..

अड. देसाई क्रिडांगणात कै. महेश मोरे यांच्या स्मरणार्थ क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

vishwatmaklokswamivarta

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊनतरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करावा- मंत्री अतुल सावे

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta