
व्हीबी-जी राम जी’ योजनेची पारदर्शक आणि प्रभावी अंमलबजावणी करा-रोहयो मंत्री भरत गोगावले· विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देश
मुंबई, प्रतिनिधी : ‘व्हीबी-जी राम जी’ या नवीन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये शासन पातळीपासून गाव पातळीपर्यंतच्या संपूर्ण यंत्रणेने सतर्कता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व राखावे. यंत्रणेचा कोणत्याही स्तरावर गैरफायदा घेतला जाणार नाही, याची दक्षता घेऊन योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. सर्व यंत्रणांना या योजनेची सविस्तर माहिती होण्यासाठी विभागनिहाय कार्यशाळा आयोजित करण्यात याव्यात असे निर्देशही त्यांनी दिले.
‘व्हीबी-जी राम जी’ योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस रोजगार हमी योजना विभागाचे सचिव अप्पासो धुळाज, आयुक्त श्रीमती अनिता मेश्राम, सहसचिव अतुल कोदे यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते



