vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

‘इंडिया स्किल्स स्पर्धेत’ युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित ‘इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन २०२६-२७’(India Skills Competition) चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने नोंदणी करून आपल्या कौशल्याला जागतिक व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त राजू वाकुडे यांनी केले आहे.

भारत सरकारच्या ‘नॅशनल स्किल डेव्हलपमेंट काऊन्सिल’च्या (NSDC) मार्गदर्शनाखाली होणारी ही देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धा आहे. या स्पर्धेतून निवडलेले तरुण जिल्हा, विभाग, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना थेट जागतिक स्तरावरील ‘वर्ल्ड स्किल्स कॉम्पिटिशन’ (World Skills Competition) मध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उमेदवार भारतीय नागरिक असणे अनिवार्य आहे.

सामान्य कौशल्य प्रकार ५६ असून उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००३ किंवा त्यानंतरचा असावा.टीम कौशल्य प्रकार मध्ये (रोबोटिक्स, कन्स्ट्रक्शन इ. मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००६ किंवा त्यानंतर असावा. यात ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स

  मेकॅट्रोनिक्स, रोबोटिक्स सिस्टिम्स इंटिग्रेशन लँडस्केप गार्डनिंग याचा समावेश आहे.

 

इच्छुक उमेदवारांनी अर्ज अधिकृत संकेतस्थळ www.skillindiadigital.gov.in वर जाऊन ‘User Manual’ आणि ‘List of Skills’ यांचा अभ्यास करावा.

आयटीआय (ITI), अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, विविध कौशल्य प्रशिक्षण संस्था आणि उद्योगांमधील कुशल तरुणांनी या स्पर्धेत सहभागी होऊन जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. या स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मालजीपुरा, स्टेशन रोड, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा ९४०४६७४८५९ या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवावा, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.

00000

संबंधित पोस्ट

झटपट नोकरीची हमी, लघुउद्योग करावयाचा आहे का..! कुशल कारागीर व्हायचं आहे..!तर मग आयटीआय ला प्रवेश घ्या…औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) प्रवेश सत्र -2025 साठी ऑनलाईन फॉर्म सुरु…

सरळ सेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदभरतीकरिताऑनलाईन अर्ज भरण्यास दि.26 नोहेबर पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवार, ठाणे येथे‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन 2026’ एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

मेळघाट हाटमध्ये खादी महोत्सवाला सुरवात खादीचा वापर वाढविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाची थेट कर्ज योजना…

vishwatmaklokswamivarta

विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचालाभ घेण्याचे जिल्हा व्यवस्थापकांचे आवाहन