vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 राज्य प्रतिनिधी –

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (#एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची बैठक वर्षा या शासकीय निवासस्थानी झाली.

एसटी महामंडळाच्या जागांची मालकी कायम महामंडळाकडेच राहील, यासाठी ४९ अधिक ४९ वर्षांच्या लीज मॉडेलचा विचार करण्यात येत असून, त्यामुळे जागांचे प्रभावी व्यावसायिक मूल्यवर्धन साधता येईल. तसेच, प्रकल्पांसाठी स्टॅम्प ड्युटी सवलतीसंदर्भातील कायदेशीर बाबींची तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. तसेच, प्रवाशांना अधिक सुलभ व अखंडित सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एसटी डेपो, मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे एकात्मिक नियोजन करून मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यावर भर देण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

संबंधित पोस्ट

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी..

vishwatmaklokswamivarta

बारामती विधानसभा पोटनिवडणुकरिता २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे. मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भय व सुलभरीत्या बजावता यावा, यासाठी मतदारांना भरपगारी सुट्टी जाहीर

अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

राज्यातील एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविणार – महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शासन प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तत्पर…**नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शासकीय सूचनांचे पालन करण्याचे प्रशासनाचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

ऑटोरिक्षा चालकांविरुध्द ऑनलाईन तक्रारीकरिता व्हॉट्सॲप क्रमांक उपलब्ध..

vishwatmaklokswamivarta