vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

आज जपून ठेवलेला पाण्याचे थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेलवर्षाजल संधारणासाठी महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांचे आवाहन नागरिकांना आवाहन,पाणी अडवा, जमिनीत जिरवा मोहिमेबाबत जनजागृती

ठाणे, प्रतिनिधी आज जपून ठेवलेला पाण्याचा प्रत्येक थेंब, भविष्यातील पाणी टंचाई टाळेल असा संदेश देत ठाणे महानगरपालिकेने शहरातील नागरिक, गृहनिर्माण संस्था, व्यापारी संकुले, शैक्षणिक संस्था तसेच औद्योगिक आस्थापनांना वर्षाजल संधारण (Rain Water Harvesting) प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन महापौर शर्मिला पिंपळोलकर व आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

 

हवामानातील बदल, ‘एल निनो’सारख्या जागतिक हवामानविषयक घटनांमुळे अनियमित पाऊस यामुळे भविष्यात पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

 

 प्रत्येक इमारतीच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी संकलित करून ते भूजल पुनर्भरणासाठी वापरणे ही काळाची गरज बनली आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केल्यास भविष्यातील पाणीटंचाई कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते.

वर्षाजल संधारणामुळे भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी, बोअरवेल आणि नैसर्गिक झरे अधिक काळ पाण्याने भरलेले राहतात. तसेच उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढून पाणीटंचाईच्या समस्येवर प्रभावी उपाय मिळू शकतो. शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होते, तर पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षणही साध्य होते.

 

याशिवाय, पावसाचे वाहून जाणारे पाणी नियंत्रित झाल्याने पूरस्थितीचा धोका कमी होण्यास मदत होते. टँकर किंवा इतर पर्यायी पाणीपुरवठ्यावर होणारा खर्चही कमी होतो. योग्य प्रक्रियेनंतर हे पाणी विविध घरगुती आणि अन्य उपयोगांसाठी वापरता येऊ शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भावी पिढ्यांसाठी पाण्याचा शाश्वत साठा निर्माण करून जलसुरक्षेला बळकटी मिळते.सर्व नागरिक, संस्था व आस्थापनांनी आपल्या परिसरात वर्षाजल संधारण प्रणाली उभारून पाण्याच्या संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे. “पावसाचा प्रत्येक थेंब जपा, भविष्यातील पाणी सुरक्षित करा” हा संदेश देत महापालिकेने जलसंवर्धन ही सामूहिक जबाबदारी असे नमूद केले आहे.

0000

——–

संबंधित पोस्ट

हॉलिवूडन गरीत मराठी तारे-तारकांचा ‘नाफा’ रेड कार्पेट जल्लोष ! मराठी कला-संस्कृतीचा अमेरिकेत जागर! ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना ‘नाफा जीवन गौरव प्रदान !

भारतभेटीने प्रभावित झाल्याची पॅराग्वे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना यांची भावनापॅराग्वेच्या राष्ट्राध्यक्षांचे राजभवन येथे स्वागत-संघटित गुन्हेगारी, ड्रग माफियांचे संकट दूर करण्यासाठी पॅराग्वेला सहकार्याची अपेक्षा..

सुभेदारीच्या व्हीव्हीआयपी सुट चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मान पत्र देऊन कार्याचा गौरव करण्यात आलासंविधान हत्या दिवस-2025 कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आणीबाणीतील चित्रांचे प्रदर्शन महिनाभर खुले राहणार..

महाराष्ट्र आता थांबणार नाही…! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालानुसार महाराष्ट्र सर्वच आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर; दिमाखदार वाटचालीसाठी नागरिकांचे अभिनंदन

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा संपन्न..