vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी  भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….

छत्रपती संभाजीनगर येथे 19 जुलै रोजी

भव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा….

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर शहरात रविवार, दि. १९ जुलै २०२६ रोजी भव्य दिव्य राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा आयोजित करण्यात आला वेळ दुपारी १.३०ते सायं. ६.३०या वेळेत पार पडणार आहे. सदर मेळाव्याचे आयोजन डोंगरदेव वधू-वर सूचक केंद्र यांच्या वतीने करण्यात आले असून, स्थळ आहे. डॉक्टर मौलाना अबू कलाम संशोधन केंद्र सलीम अली समोर टीव्ही सेंटर छत्रपती संभाजीनगर संस्थेच्या माहितीनुसार, डोंगरदिवे वधू-वर सूचक केंद्राने आजपर्यंत तब्बल १५७७१ विवाह जुळवून दिले असून, हजारो कुटुंबांना संसाराच्या नव्या वाटेवर मार्गदर्शन केले आहे. या यशस्वी परंपरेचा लाभ अधिकाधिक युवक-युवती आणि पालकांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष कांतीलाल डोंगरदिवे यांनी केले आहे. या राज्यस्तरीय मेळाव्यात विविध जिल्ह्यांतील इच्छुक वधू-वर व त्यांच्या पालकांना प्रत्यक्ष भेट, संवाद आणि माहिती देवाण-घेवाण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सुव्यवस्थित नोंदणी प्रक्रिया, स्वतंत्र कक्ष व्यवस्था आणि मार्गदर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

 

इच्छुकांनी वेळेत उपस्थित राहून या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. संपर्कासाठी कांतीलाल डोंगरदिवे 9881950754 / 8421102452 या नंबरवर कॉल करू शकता.

संबंधित पोस्ट

288 नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान3 डिसेंबर 2025 मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

मापात पाप केल्यास शिक्षा अटळ;वजन-मापे अचुकतेची पडताळणी करण्याचे आवाहन

मी हाय तुझ्या पाठीशी, म्हावरं काप बिनधास्त”मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी वाकोला मासळी बाजारातील कोळी भगिनींना केले आश्वस्त,मासळी बाजारात मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादलेले नाहीत

देऊळगाव राजा तालुक्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 9 जुलैला

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग-तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ,कर्ज प्रक्रिया सुटसुटीत होणार, प्रलंबित प्रकरणे निकाली निघण्यास चालना मिळणार

धरती आबा’ आणि ‘पीएम जनमन’ योजना लोकचळवळ बनवण्याचे मंत्री डॉ. अशोक उईके यांचे आवाहन* १५ ऑगस्टपूर्वी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश*