vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त फळवाटप व वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

जालना : प्रतिनिधी  खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. विशाल धानुरे व सय्यद करीम बिल्डर यांच्या पुढाकाराने गांधी चमन येथील महिला जिल्हा रुग्णालयात फळवाटप आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजेंद्र राख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच रुग्णालय परिसरासह शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी डॉ. विशाल धानुरे म्हणाले, खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राजेंद्र राख यांनीही आपल्या मनोगतातून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सय्यद करीम बिल्डर यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी राजेंद्र गोरे, उबाळे पाटील, चंद्रकांत रत्नपारखे, दिनेश सुराणा, शेख शकील, कलीम खान, शेख शमशोद्दीन, शेख वसीम, बाबासाहेब सोनोने, वसीम खान, रघुवीर गुडे, जफर मिर्झा, सूरज यंगलंटीवार, नेल्सन काबळे, दिग्विजय, शेख जमीर, रहीम बिल्डर, शेख अनीस, सय्यद रज्जाक, आमेर खान, इमरान खान, शेख इरफान, भरत लोढा यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सामाजिक उपक्रमाला रुग्ण तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संबंधित पोस्ट

शासकीय विभागानी नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा द्याव्यात – सेवा हक्क आयुक्त चित्रा कुलकर्णी,पारनेर तालुक्यात सेवा वितरणाचा आढावा

सुसंस्कृत लातूरची ओळख जपूया, सामाजिक एकोपा वृद्धिंगत करूया-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• यंदाही लातूर जिल्ह्यात ‘डीजे मुक्त’ गणेशोत्सव• बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या ‘डीजे’वर पोलीस गुन्हे दाखल करणार

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका खास मुलाखतीत स्पष्ट केलं की, मुंबईचा पुढील महापौर महाराष्ट्रातील महायुतीचाच असेल आणि तो हिंदू व मराठीच …

अन्यायकारक वक्फ दुरूस्ती विधेयक विरूध्द शनिवार रोजी आयोजित आंदोलनामध्ये हजारोंच्या संख्येने सामिल व्हा- शेख महेमूद

महा स्माईल्स’ मोहिमेमुळे विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर पुन्हा फुलणार हसू.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य*

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन..