vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

अमृत उद्योग कौशल्यवर्धन दहा दिवसीय प्रशिक्षणास नांदेडमध्ये उत्साहात प्रारंभ

नांदेड, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘अमृत उद्योग कौशल्यवर्धन’ दहा दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ नांदेड येथील अमृत कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात नवउद्योजकांना नवीन उद्योग सुरू करण्यासाठी तसेच विद्यमान उद्योगाचा विस्तार (स्केल-अप) करण्यासाठी आवश्यक तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक बाबींचे मार्गदर्शन पुढील दहा दिवस तज्ज्ञांकडून करण्यात येणार आहेप्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आला

. यावेळी संभाजीनगर विभागाचे विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे आणि नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ माळहिप्परगेकर यांनी प्रशिक्षणार्थींना उद्योजकतेच्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि स्वावलंबनाकडे वाटचाल याविषयी मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमास प्रमुख प्रशिक्षक अनिरुद्ध तोष्णीवाल, विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे, जिल्हा व्यवस्थापक सौरभ माळहिप्परगेकर, जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी तसेच अमृत मित्र विश्वास बदापूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा उपव्यवस्थापक विश्वेश्वर जोशी यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन विश्वास बदापूरकर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला नांदेड जिल्ह्यातील नवउद्योजक आणि प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, उद्योग व उद्योजकता क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

00000

संबंधित पोस्ट

लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम • मेहकरमधील विविध विकासकामांचे लोकार्पण

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

कौशल्य विकास केंद्राचा मंगळवारी रोजगार मेळावा

गुणवत्तापूर्ण कामे करण्याला प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

शासकीय अधिकाऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्यामदतीने सामाजिक उत्तरदायित्त्व पार पाडावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार   

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

vishwatmaklokswamivarta