vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

कामशेत अपघातानंतर आरोग्य यंत्रणेची तत्परता कौतुकास्पद,आरोग्य योजनांमुळे वारकऱ्यांना तत्काळ आणि विनामूल्य उपचार..

मुंबई, प्रतिनिधी  : जुन्या पुणे–मुंबई महामार्गावर पहाटे वारकऱ्यांच्या दिंडीत झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागाने दाखविलेली तत्परता आणि संवेदनशीलता कौतुकास्पद ठरली आहे. अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पूर्णपणे विनामूल्य आणि गुणवत्तापूर्ण उपचार उपलब्ध करून देण्यात आले.

अपघातानंतर काही मिनिटांतच महावीर हॉस्पिटल, कामशेत येथे जखमींना दाखल करण्यात आले. शासनाच्या आपत्कालीन उपचार आदेश (ETI) प्रक्रियेच्या माध्यमातून तत्काळ शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि आवश्यक वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आल्या. यामुळे कोणत्याही रुग्णाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला नाही

राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आरोग्य योजनांचा लाभ मिळाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपचार, औषधे आणि रुग्णालयीन सेवा या सर्व सुविधा शासनाच्या सहाय्याने पूर्णपणे विनामूल्य पुरविण्यात येत आहेत.या प्रसंगी आरोग्य विभागाने दाखवलेली संवेदनशीलता “आरोग्य हक्क — सर्वांसाठी!” या शासनाच्या ध्येयाला प्रत्यक्ष कृतीत उतरवणारी ठरली आहे. शासनाच्या आरोग्य योजनांमुळे ग्रामीण आणि वारकरी समाजालाही अत्याधुनिक उपचार सेवा सहज उपलब्ध होत असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले.

महावीर हॉस्पिटल प्रशासन, स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभागाने समन्वयातून काम करत सर्व जखमींना तातडीने सेवा उपलब्ध करून दिली. शासनाकडून आवश्यक सुविधा, औषधांचा पुरवठा आणि सर्वतोपरी मदत पुरविण्यात आली आहे.

या घटनेतून शासनाच्या आरोग्य यंत्रणेची कार्यक्षमता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षिततेबद्दलची बांधिलकी पुन्हा एकदा दृढ झाली आहे.

संबंधित पोस्ट

धुळे, नंदूरबार जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण करा;कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करावी- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

रत्नागिरीत २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; पंचतारांकित हॉटेलसाठी १०० कोटींची गुंतवणूक ‘जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ मध्ये पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांची माहिती

बॉलीवूड अभिनेता श्रेयस तळपडे, आलोकनाथ विरोधात FIR दाखल; हरियाणा सोनीपत येथील कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण…

vishwatmaklokswamivarta

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त 27 जानेवारीला ग्रंथप्रदर्शनी

vishwatmaklokswamivarta

पंचगंगा नदी परिसरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांना गती द्या   – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे,राज्यातील सर्वच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचे ऑडिट करून अहवाल सादर करण्याचे निर्देश..

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय कार्यालय कन्नड यांना विभागस्तरीय पारितोषिक जाहीर