vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

‘हिंद-दी-चादर’ श्री गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत आजपासून विविध उपक्रम- लातूर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून जनजागृती मोहीम

 

लातूर, ‍ प्रतिनिधी : धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त त्यांचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत केला जाणार आहे. यानिमित्त आजपासून जिल्ह्यात शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

प्रभात फेरी’च्या माध्यमातून शिक्षण विभाग करत आहे. प्रभात फेरी गुरूवार पासून (दि.१६ ते २३ जानेवारी) जिल्हाभरातील शाळांमधून निघणार आहे. नांदेड येथील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घराघरात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचा इतिहास पोहचविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत २५ जानेवारीपर्यंत सर्व शाळांच्या नित्य परिपाठात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे, त्यांच्या जीवनपटावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर १७ जानेवारीपर्यंत दरम्यान चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होतील. जिल्हास्तरावर विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव नांदेड येथे आयोजित मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊनही सन्मानित केले जाईल.

#hinddichadar350 या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी आणि तरुणाईने #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट, फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

**

संबंधित पोस्ट

शाहिदी शताब्दी व गुरु-ता-गद्दी समागमच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समागम कार्यक्रमाच्या आयोजनासाठी राज्यस्तरीय समितीची बैठक

शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी विश्वपदयात्रा ; बुलडाण्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वागत

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात अन्न भेसळ संदर्भात कार्यशाळा; प्रात्यक्षिकाव्दारे तज्ज्ञांचे मार्गदर्शन

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

मतदारांच्या मॅपिंगवर लक्ष केंद्रीत करावे-जिल्हाधिकारी आशिष येरेकर*मतदारयाद्यांच्या पुनरिक्षणासाठी पूर्वतयारी*एप्रिल महिन्यात एसआयआर मोहिम

जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*