vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

‘हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

लातूर, ‍ प्रतिनिधी: धर्म, सत्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणारे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहीदी समागम वर्ष ! या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधून, श्री. गुरू तेग बहादूर साहिबजींचा गौरवशाली इतिहास, त्यांच्या त्यागाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न ‘प्रभात फेरी’च्या माध्यमातून शिक्षण विभाग करत आहे. प्रभात फेरी गुरूवार पासून (दि.१६ ते २३ जानेवारी) जिल्हाभरातील शाळांमधून निघणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

 नांदेड येथील आसर्जन परिसरातील (मोदी ग्राउंड) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ‘घराघरात आणि मनामनात’ हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजींचे विचार रुजविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

विद्यार्थी होणार ‘विचारदूत’केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर कृतीतून इतिहास समजून घेण्यासाठी जिल्हाभरात भव्य प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या हाती असलेले फलक आणि मुखातील जयघोष यामुळे वातावरण भक्तीमय होणार आहे. याशिवाय, २५ जानेवारीपर्यंत सर्व शाळांच्या नित्य परिपाठात हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शौर्यावर आधारित गीतांचे गायन, त्यांच्या जीवनपटाचा (डॉक्युमेंटरी) विशेष शो आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्यांना ‘सुवर्णसंधी’-विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी तालुका, जिल्हास्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर १५ ते १७ जानेवारी दरम्यान चित्रकला, गायन, निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा होतील. जिल्हास्तरीय महाअंतिम फेरी २० जानेवारी रोजी निवडक विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा ‘गुरुग्रंथसाहेबजी भवन’, सचखंड पब्लिक स्कूलजवळ, हिंगोली गेट, नांदेड येथे पार पडेल. जिल्हास्तरावर विजेत्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव मुख्य सोहळ्यात (२४ व २५ जानेवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊनही सन्मानित केले जाईल.

डिजिटल सेवेची साद-#hinddichadar350 या ऐतिहासिक सोहळ्याची व्याप्ती वाढविण्यासाठी डिजिटल माध्यमांचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. नागरिकांनी आणि तरुणाईने #hinddichadar350 या हॅशटॅगचा वापर करून कार्यक्रमाशी संबंधित पोस्ट, फोटो आणि रिल्स सोशल मीडियावर शेअर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.अधिक माहितीसाठी: कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा gurutegbahadurshahidi.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच शाळांनी अधिक माहितीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगार, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, जिल्हा परिषद, नांदेड यांच्याशी ssananded1@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा, असेही त्यांनी कळवले आहे.

**00

संबंधित पोस्ट

अपघातास कारणीभूत विजेचे खांब आणि रोहित्रांबाबत अधिक्षक अभियंता, आयुक्तांना नोटीसअन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार – अ‍ॅड. ईश्वर बिल्होरे…

vishwatmaklokswamivarta

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील 100 विहिरी स्वच्छ करून त्यातील पाण्याचा पिण्याव्यतिरिक्त वापर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय..

महिलांच्या सक्षमीकरणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेतर्फे राज्यभरात ‘शस्त्रपूजन’ आणि ‘शौर्यजागृती’ उपक्रम लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याची युवतींची लोकप्रतिनिधींकडे मागणी 

आखाती देशातील युद्धसदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रभावित झालेली विमान सेवा व विमान उड्डाणे सुरू

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते ‘खासदार परिचय पुस्तिका’ प्रकाशित