vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार

मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेतून मातांना आर्थिक आधार

मुंबई, प्रतिनिधी प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही गर्भवती व स्तनदा महिलांचे पोषण व आरोग्य सुधारण्यास, प्रसूतीपूर्व तपासणी व बालकाच्या लसीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी ₹५,००० आणि दुसरे अपत्य मुलगी असल्यास ₹६,००० आर्थिक लाभ देण्यात येतो. मुंबई शहर जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये आतापर्यंत ४,६७६ लाभार्थ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 16,708 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले आहेत.

पात्र महिलेने जवळच्या अंगणवाडी किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक तपासण्या व लसीकरणाची पूर्तता केल्यास या योजनेचा लाभ घेता येतो.

गर्भधारणेदरम्यान महिलांचे पोषण व आरोग्य सुनिश्चित करणे. गर्भवती महिलांना वेळेवर प्रसूतीपूर्व तपासणी करण्यास प्रोत्साहित करणे. बालकाच्या जन्मानंतर आवश्यक लसीकरणास प्रोत्साहन देणे. माता व बालकाच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक शासकीय सेवांचा लाभ मिळवून देणे ही लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे आहेत.

या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी – ५,०००/- पहिला हप्ता – ३,०००/- गर्भधारणेची नोंदणी करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता तसेच किमान एक प्रसूतीपूर्व तपासणी पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार पहिला हप्ता देण्यात येतो. दुसरा हप्ता – २,०००/- देण्यात येतो. बालकाचा जन्म नोंदणी झाल्यानंतर तसेच निर्धारित कालावधीत आवश्यक लसीकरण पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार दुसरा हप्ता देण्यात येतो. तसेच, दुसरे अपत्य मुलगी असल्यास, बालकाच्या जन्म नोंदणीनंतर व निर्धारित लसीकरणाची पूर्तता झाल्यानंतर पात्र लाभार्थीस ₹६,०००/-एकरकमी आर्थिक लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र गर्भवती महिलेने आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा उप-आरोग्य केंद्रात गर्भधारणेची नोंदणी करावी. बँक खात्याची खात्री करणे आवश्यक असून, लाभार्थीचे स्वतःचे बँक खाते उपलब्ध असून ते डीबीटी साठी कार्यरत आहे व एनपीसीआय शी जोडलेले आहे, याची खात्री करावी.

तसेच, लाभार्थी महिलेचे माता व बाल संरक्षण कार्ड, आधार कार्ड, पात्रतेनुसार आवश्यक कागदपत्रांपैकी कोणतेही एक कागदपत्र असणे आवश्यक आहे. बँक खाते तपशील / डीबीटीसाठी आवश्यक माहिती तसेच पात्रतेनुसार इतर आवश्यक कागदपत्रे, पात्रतेनुसार उपलब्ध कागदपत्रे यामध्ये अनुसूचित जाती /

0000

संबंधित पोस्ट

आरोग्य क्रांतीकडे गडचिरोलीची वाटचाल!  ​’माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ मोहिमेत जिल्ह्यातील ४५९ ग्रामपंचायतींचा उत्स्फूर्त सहभाग 

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती

केंद्रीय मार्ड आंदोलनाविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत बैठक

vishwatmaklokswamivarta

एम्स नागपूर आणि बाल आयुष फाउंडेशन यांच्यात अस्थिमज्जा प्रत्यारोपण (बीएमटी) सेवावृद्धीसाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ – यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 ची संकल्पना लोकांच्या दीर्घायुष्‍य आणि निरामयतेप्रति समग्र दृष्टीकोन अधोरेखित करते“योग आपल्याला सन्मानपूर्वक जगण्‍यासाठी वृद्धापकाळात निरोगी राहण्‍याची कला शिकवतो”: केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया