vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रायगड-अलिबाग(m प्रतिनिधी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने आयोजित ‘अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठ’ उपक्रमाला महाड येथे ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री वीरेश्वर मंदिर सभागृह, महाड येथे दि. 21 ते 23 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या बाजारपेठेत रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील नवउद्योजकांनी सहभाग घेत आपल्या उत्पादनांचे थेट ग्राहकांपर्यंत सादरीकरण व विक्री केली.

‘अमृतपेठ’चे उद्घाटन विश्व हिंदू परिषदेचे शरददादा गांगल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक शिवराजजी भागवत, महाड नगरपरिषदेचे नगरसेवक अॅड.सनी जाधव, सौ. विद्याताई देसाई, मणिरी वेस्ट मॅनेजमेंटच्या संस्थापक सौ ममता मेहता तसेच मणिरीच्या स्वयंसेविका सौ.दीप शेट, सौ.कांचन महाडीक, सौ.गायत्री बोरगावकर, सौ.मृणाल शेट, रोशनजी भुवड, विशानेमा गुजराती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रियंका गुजर आणि प्रभात कॉलनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.जयश्री मेहता यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

एक दिवस राष्ट्रासाठी’ या उपक्रमांतर्गत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरासाठी जनकल्याण रक्त केंद्राने विशेष सहकार्य केले. अमृतपेठमधील उद्योजिका तसेच बाजारपेठेला भेट देणाऱ्या ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. व्यवसायासोबतच समाजासाठी योगदान देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या बाजारपेठेत घरगुती पिठे, हस्तकलेच्या वस्तू, इमिटेशन ज्वेलरी, विणकामाच्या वस्तू, घरगुती मसाले, आयुर्वेदिक उत्पादने, सोलर प्रणालीवर चालणारी उपकरणे, महिलांनी हाताने तयार केलेल्या आकर्षक पर्स यांसह विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होती. स्थानिक उद्योजकांनी तयार केलेल्या दर्जेदार व नाविन्यपूर्ण उत्पादनांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळाली.

यावेळी मान्यवरांनी सहकुटुंब ‘अमृतपेठ’ला भेट देत नवउद्योजकांशी संवाद साधला आणि त्यांच्या उत्पादनांची खरेदी करून त्यांना प्रोत्साहन दिले. व्यवसाययोग्य प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उभारणे, स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे ही आजच्या काळाची गरज असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असे आवाहन मान्यवरांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘अमृत’मार्फत महिलासक्षमीकरण, लघुउद्योगांना चालना आणि स्वयंरोजगार निर्मितीवर भर देण्यात येत आहे. स्थानिक लघुउद्योजक तसेच लक्षित गटातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांच्या विक्री कौशल्याला चालना मिळावी आणि ग्राहकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळावी, या उद्देशाने व्यवस्थापकीय संचालक (अमृत) यांच्या संकल्पनेतून ‘अमृतपेठ – थेट स्वदेशी बाजारपेठ’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महाड येथील बाजारपेठ सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुली होती. या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते महिला व पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेले ‘लकी ड्रॉ कूपन’. वामन हरी पेठे ज्वेलर्स, माणगाव यांच्या सहकार्याने लकी ड्रॉमधून विजेत्यांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.तीन दिवस चाललेल्या या बाजारपेठेला महाड व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देत स्थानिक उद्योजकांच्या उत्पादनांना पसंती दिली. ग्राहकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नवउद्योजकांच्या आत्मविश्वासाला बळ देणारा ठरला.

वंदे मातरम्‌च्या जयघोषाने आणि दीपप्रज्वलनाने ‘अमृतपेठ’ची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि उद्योजकतेचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला. या उपक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने करण्यात आली.‘अमृतपेठ’ यशस्वी करण्यासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, उपव्यवस्थापक मंगेश ढेबे, अमृतसखी जान्हवी साठे तसेच स्थानिक अमृत मित्र विक्रांत बुटाला आणि केदार पुरोहित यांनी अथक परिश्रम घेतले.

00000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र शासन जिंदाबाद ! जिल्हा प्रशासनाच्या तत्काळ मदतीवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाण्यात अडकलेल्या दोन बस सुखरूप बाहेर; प्रवाशांचे जिल्हा प्रशासनाचे आभार

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

vishwatmaklokswamivarta

हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागात विविध पदासाठी भरती- शिकाऊ उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा

राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याचा पाणी पुरवठा निश्चित करावा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील