vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा – उपसभापती सचिन अहिर

हाफकिन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा – उपसभापती सचिन अहिर

मुंबई : प्रतिनिधी

हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करणे आणि महामंडळाचे अद्ययावतीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

हाफकिनच्या कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, वित्त विभागाचे अवर सचिव क. ति. बडगुजर, हाफकिनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश चव्हाण आणि कर्मचारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते

या बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यावर सकारात्मकता दर्शवली. तसेच महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मागील अधिवेशनात मागणी केलेल्या विशेष निधीचा संदर्भही यावेळी देण्यात आला

हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला लागणाऱ्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्येच करण्यात यावी, असा प्रस्ताव तात्काळ पालिकेकडे सादर करण्याचे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी प्रशासनाला दिले.

संबंधित पोस्ट

लोकशाही दिनामध्ये अर्जदाराने वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारींचे निराकरण-करण्याकामी 15 दिवस आधी अर्ज पाठविणे आवश्यक  –जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून ऑलिंपिक दिनाचे आयोजन

आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी घेतला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

भारतीय तिरंगा यात्रा केवळ रॅली नसून देशप्रेमाची भावना – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरळी सी फेसवर ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारा हा #महसूलविभाग.