vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

अचूक मतदार यादीसाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी किशन जावळे**प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध; नावांबाबत हरकती व दावे असल्यास सादर करावेत*

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR 2026) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी प्रारुप मतदार यादी तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे व हरकती सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) नितीन वाघमारे उपस्थित होते.

मा.भारत निवडणूक आयोग यांच्याकडील निर्देशानुसार राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघात दिनांक 01 ऑक्टोबर 2026 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमाच्या सुधारीत वेळापत्रकानुसार सर्व मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत अंमलबजावणी पार पाडण्यात येणार आहे

कार्यक्रमाचे सुधारीत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :-मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण/पुनर्रचना, सुधारीत वेळापत्रक, दि.24 ऑगस्ट 2026, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026, दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.30 सप्टेंबर 2026 . नोटीस टप्पा/दावे व हरकती निकालात काढणे सुधारीत वेळापत्रक, दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 . अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी दि.4 नोव्हेंबर 2026.

त्या अनुषंगाने जिल्हयातील 7 विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र ठिकाणी/पदनिर्देशित ठिकाणी मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत सोमवार दिनांक 31 ऑगस्ट, 2026 रोजी यादीभाग निहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये digitization नंतर 19 लाख 49 हजार 341 इतके मतदार आढळून आलेले आहेत. त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.

188 पनवेल विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 545, एकूण मतदार 6 लाख 84 हजार 095, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 4 लाख 566, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 2 लाख 83 हजार 356, मॅप न झालेले मतदार 89 हजार 174, अनॉमाली 61 हजार 100

189 कर्जत विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 362, एकूण मतदार 3 लाख 19 हजार 337, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 57 हजार 442, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 61 हजार 881, मॅप न झालेले मतदार 15 हजार 791, अनॉमाली 17 हजार 497.

190 उरण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 352, एकूण मतदार 3 लाख 57 हजार 255, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 72 हजार 772, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 84 हजार 416, मॅप न झालेले मतदार 37 हजार 227, अनॉमाली 21 हजार 419.

191 पेण विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 378, एकूण मतदार 3 लाख 5 हजार 343, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 68 हजार 217, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 37 हजार 122, मॅप न झालेले मतदार 13 हजार 715, अनॉमाली 16 हजार 666.

192 अलिबाग विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 373, एकूण मतदार 3 लाख 9 हजार 580, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 66 हजार 800, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 42 हजार 760, मॅप न झालेले मतदार 18 हजार 925, अनॉमाली 23 हजार 798.193 श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 345, एकूण मतदार 3 लाख 62 हजार 680, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 33 हजार 564, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 29 हजार 115, मॅप न झालेले मतदार 10 हजार 775, अनॉमाली 14 हजार 85.194 महाड विधानसभा मतदार संघात एकूण मतदान केंद्रे 392, एकूण मतदार 2 लाख 95 हजार 449, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 2 लाख 49 हजार 980, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 45 हजार 468, मॅप न झालेले मतदार 12 हजार 734, अनॉमाली 29 हजार 698

असे एकूण मतदान केंद्रे 2 हजार 747, एकूण मतदार 25 लाख 33 हजार 739, गणना प्रपत्राचे डिजीटायझेशन झालेले मतदार 19 लाख 49 हजार 341, गणना प्रपत्राचे संकलन करता आले नाही असे मतदार 5 लाख 84 हजार 118, मॅप न झालेले मतदार 1 लाख 98 हजार 341, अनॉमाली 1 लाख 84 हजार 263.ज्या पात्र मतदारांची नावे वर नमूद प्रारुप मतदार यादीमध्ये आढळून येणार नाही किंवा जे नव मतदार असतील त्यांना दावे व हरकती दिनांक 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे दाखल करता येतील. मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना 6 (त्यासोबतच्या घोषणापत्र व आवश्यक कागदपत्रासह) भरण्याची सुविधा उपलब्ध राहील. मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडून सदर अर्जाची पडताळणी करुन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. या एका महिन्याच्या कालावधीत (दावे व हरकतीचा कालावधी) मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी संबंधित मतदार अनुक्रमे नमुना 6 किंवा नमुना 8 भरु शकेल. तसेच संबंधित मतदार संघातील कोणताही मतदार सदर यादीतील कोणतीही नोंद वगळण्यासाठी नमुना 7 भरुन हरकती घेऊ शकेल. राजकीय पक्षांना प्राप्त दावे व हरकतींची यादी प्रत्येक आठवडयास उपलब्ध करुन देण्यात येतील.मतदार नोंदणी अधिकारी/सहायक मतदान नोंदणी अधिकारी हे मतदारांनी केलेल्या दावे व हरकतीची सुनावणी दि.31 ऑगस्ट 2026 ते दि.29 ऑक्टोबर 2026 या कालावधीत घेऊन दावे व हरकतींवर निर्णय घेतील.अंतिम मतदार यादी दिनांक 04 नोव्हेंबर, 2026 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. मतदार नोंदणी अधिकारी यांच्या निर्णयाविरुध्द प्रसिध्दी दिनांकपासून 15 दिवसाचे आत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील नियम 24 अंतर्गत अपीलीय अधिकारी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्याकडे स्वतः हजर राहून अपिल अर्ज दाखल करण्याबाबतची तरतूद आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाविरूध्द मा.मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, रायगड यांच्या निर्णयाचे दिनांकापासून 15 दिवसांचे आंत अंतिम अपील करू दाखल करू शकतात.

मतदार यादीच्या अनुषंगाने नाव समाविष्ट करणे, सुधारणा करणे किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची घोषणा / विधान केल्यास लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 31 नुसार संबंधित व्यक्ती 1वर्षापर्यतची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्ही यांना पात्र ठरते याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

 

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रभाग रचना प्रक्रिया 30 जून अखेर पूर्ण करावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

भारताच्या डिजिटल कौशल्य मोहिमेला गती देण्यासाठी “बढना है तो यहाँ जुडना है” या देशव्यापी मोहिमेचा, केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी ‘एस आय डी एच’ या कौशल्य भारत डिजिटल केंद्राच्या माध्यमातून केला शुभारंभ

ग्रामीण साहित्य चळवळीचा बिनीचा शिलेदार हरपलाज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली..

vishwatmaklokswamivarta

आरोग्य शिबिरांतर्गत उपचार झालेल्या घरेलु कामगार महिलांचा आनंद सोहळा- दसऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी, डॉक्टरांना दिले आपटारूपी सोने- मोफत उपचाराबद्दल मानले जिल्हा प्रशासन, डॉक्टरांचे आभार..

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाची बैठकजलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करणार-मंत्री राधाकृष्ण विखे पाटील