vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी*         *- श्री.शेरसिंग डागोर**महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षांनी विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा*

*सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी*         *- श्री.शेरसिंग डागोर**महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाच्या अध्यक्षांनी विविध योजनांचा घेतला सविस्तर आढावा*

रायगड- प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) श्री. शेरसिंग डागोर यांनी ६ व ७ ऑक्टोबर रोजी रायगड जिल्ह्याला भेट दिली. या भेटीदरम्यान ७ ऑक्टोबर रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सफाई कामगारांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला.

   या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) नेहा भोसले, सहाय्यक आयुक्त (समाज कल्याण)श्री. सुनिल जाधव, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.शीतल जोशी, पोलीस उप अधीक्षक (गृह),जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि.प.), तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

  आढावा बैठकीमध्ये उपस्थितांना संबोधित करताना अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांनी प्रचलित शासन निर्णय व परिपत्रकांच्या अनुषंगाने सफाई कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी प्रशासनाने नेहमी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.

  लाड-पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसांना वारसाहक्काने नियुक्ती देण्याबाबत सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांमध्ये जाणीवजागृती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, वारसाहक्काने नियुक्ती मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित यंत्रणेने स्वतः पुढाकार घेऊन सफाई कामगारांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करावे, असे निर्देश त्यांनी दिले.

 सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजना, रमाई आवास योजना आणि आरोग्य सुविधांसाठी राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा सुलभतेने लाभ घेता यावा, यासाठी त्यांचे वेळोवेळी प्रबोधन करण्यात यावे, असे मत अध्यक्षांनी व्यक्त केले.

    याचबरोबर सफाई कामगारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ‘नमस्ते भारत’ या योजनेखाली सुरक्षा किट तातडीने पुरवण्यात यावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

   अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या इयत्ता १ ली ते १० वी च्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. या योजनेचा तसेच इतर शैक्षणिक योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून व्यापक जनजागृती करण्यात यावी, असे निर्देश अध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

     बैठकीचा समारोप करताना अध्यक्ष श्री. शेरसिंग डागोर यांनी सांगितले की, सफाई कामगार हा समाजातील अत्यंत दुर्लक्षित आणि अशिक्षित वर्ग आहे. त्यामुळे त्यांच्या उन्नतीसाठी शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या अनेक चांगल्या योजनांपासून ते अनभिज्ञ राहतात व माहितीअभावी या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. ही परिस्थिती बदलण्यासाठी वर्तमानपत्रे, सोशल मीडिया व अन्य हक्काच्या प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करून योजनांची माहिती थेट सफाई कामगारांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

00000000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यात खरीपसाठी मुबलक #खत साठा उपलब्ध• शेतकऱ्यांनी अफवांना बळी न पडता खत तुटवड्याच्या भीतीपोटी अनावश्यक खत खरेदी करू नये

राकाँपा जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या प्रचार पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस–मनसे युतीच्या उमेदवारांना मतदारांचा वाढता पाठिंबा; ठिकठिकाणी पुष्पहारांनी स्वागत..

अरुणोदय वॉकर्स असोसिएशन ने आंतरराष्ट्रीय योग दिवस केला साजरा

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते १०३ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदक प्रदान लोकभवन येथे पोलीस पदक प्रदान सोहळा संपन्न;

नागपूर बोर्डात समस्या निवारण सभाआमदार सुधाकर अडबाले यांच्‍या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चा..

बिनागुंडा परिसरात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची संयुक्त क्षेत्रभेट,जिल्हाधिकाऱ्यांच्या दौऱ्यानंतर बिनागुंडा परिसरात योजनांच्या अंमलबजावणीला गती वनपट्टेधारकांना फार्मर आयडी, घरकुल व विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन..