२ नोव्हेंबर रोजी मो. ह. विद्यालयात मोहवि मना- संगीत सुमनांजली कार्यक्रम
ठाणे प्रतिनिधी- जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूटचे मो.ह. विद्यालय व रमेश परमार कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे यांच्या वतीने शाळेच्या १३५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोहवि मना हा संगीत सुमनांजली कार्यक्रम संपन्न होणार आहे
शाळेचे माजी विद्यार्थी ही संगीत सुमनांजली सादर करणार आहेत. २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत शाळेच्या चौथ्या मजल्यावर सभागृहात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे
पंडित मुकुंद मराठे, डॉक्टर प्रकाश चिटणीस, पंडित मुकुंदराज देव, चारुदत्त नायगावकर, डॉक्टर वैशाली दुधे, किशोर तेलवणे, मेघना काळुंद्रेकर, सुभाष मालेगावकर, मिलिंद जोग, अनुप वालावलकर, मोहन गांगुर्डे, संजय दीक्षित, सुनेत्रा मिस्त्री हे सहभागी नामवंत प्रथितयश माजी विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुख्याध्यापिका सौ. सविता पेंडसे यांनी केले आहे