vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत२१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास उपक्रमांतर्गत२१ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

 

लातूर, प्रतिनिधी: छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील युवक-युवतींसाठी ‘सर सेनापती संताजी घोरपडे सारथी उद्योजकता विकास (इनक्युबेशन) उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत पात्र युवक-युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्ये विकसित करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सारथीच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत, असे आवाहन सारथी विभागीय कार्यालय उपव्यवस्थापकीय संचालक व उपजिल्हाधिकारी श्रीमती आम्रपाली कासोदेकर यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या लक्षित गटातील समाजाचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास साधण्यासाठी सारथी संस्थेची स्थापना करण्यात आली असून, संस्थेमार्फत विविध कल्याणकारी योजना व उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा इनक्युबेशन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, बारामती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणच्या एकूण १३ नामांकित इनक्युबेशन संस्थांची निवड करण्यात आली आहे. या निवडक १३ इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून प्रत्येकी १० नवउद्योजकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण उद्योजकीय संकल्पनांवर आधारित उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाणार आहे.

या उपक्रमाबाबतची सविस्तर माहिती, आवश्यक सूचना आणि संबंधित इनक्युबेशन संस्थांच्या स्वतंत्र लिंक सारथीच्या https://sarthi.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तरी मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील जास्तीत जास्त इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि उद्योजकतेच्या माध्यमातून स्वावलंबी होण्यासाठी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्रीमती कासोदेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध;11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनाः ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेसाठी बेरोजगार उमेदवारांनी अर्ज करण्याचे आवाहन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात बुधवारी (दि.११) पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी), तर्फेबदनापूर येथे मोफत ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन

वाशीत रंगणार औद्योगिक तंत्रज्ञानाचा महाकुंभ;’बॉइलर इंडिया २०२६’ आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे ८ ऑक्टोबरला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन!