vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

आजचे पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव…

आजचे पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव…

 

नवी दिल्ली: प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ -उतार सुरूच आहे. कच्च्या तेलाच्या भावाचा पेट्रोल, डिझेलच्या किमतींवर परिणाम होत असतो. इंधनाचे दर हे कच्च्या तेलाच्या किमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात चढ-उतार सुरू असतानाच आज पेट्रोल कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, भाव स्थिर आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये आज पेट्रोल दर प्रति लिटर 95.41  रुपये एवढे आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर 86.67  रुपये आहेत.

पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर

भारतामध्ये पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मध्यतंरी कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या. तरी देखील पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. आता किमती वाढल्यानंतर देखील इंधनाचे दर जैसे थे आहेत. दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये इतका आहे. तर मुंबईत अनुक्रमे पेट्रोल आणि डिझेलचा दर 109.98 आणि 94.14 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल डिझेलचे दर अनुक्रमे 101.40 रुपये आणि  91.43 रुपये इतका आहे. 4 नोव्हेंबरला पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी पेट्रोलचे दर हे प्रति लिटर मागे 5 रुपयांनी तर डिझेलचे दर 10 रुपयांनी कमी झाले होते. तेव्हापासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेआहेत.l

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित पोस्ट

शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची माहिती सर्व विभागांनी संकेतस्थळांवर उपलब्ध करुन द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तसेच भीमा व सीना नदीला सुरू असलेल्या विसर्गामुळे पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमिवर,सोलापूरच्या मदतीसाठी ५ यांत्रिक बोटी रवाना….

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांना प्रतिष्ठित ‘गोल्डन स्कॉच’पुरस्कार जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्वीकारला पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

नागरिक केंद्रीत ‘आपले सरकार २.०’ पोर्टल कार्यान्वित करावे  – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘इज ऑफ लिव्हिंग’ सुधारण्यासाठी राज्य शासनाचे आणखी एक पाऊल पुढे

vishwatmaklokswamivarta

 किल्ले रायगडाच्या पायथ्याशी 45 एकरात उभारण्यात येणार ‘शिवसृष्टी’.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या मातोश्री पावलो मायनो यांचे इटलीमध्ये निधन; काल पार पडले अंत्यसंस्कार….

vishwatmaklokswamivarta