vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

जनगणना प्रक्रिया समजावून घेण्यासाठीप्रशिक्षण महत्त्वाचे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जनगणनेचे कार्य हे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून त्यासाठीच्या प्रशिक्षणात सहभागी सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी सर्व प्रक्रिया पूर्णपणे लक्ष देऊन समजावून घ्यावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.

 भारतीय जनगणना २०२७ च्या पहिला टप्पा एप्रिल २०२६ पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा चार्ज अधिकारी व जनगणना कामकाज हाताळणारे अधिकारी- कर्मचारी यांचे तीन दिवसीय प्रशिक्षणास आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुरुवात झाली. या प्रशिक्षणात १६८अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले आहेत.

 या प्रशिक्षणासाठी जनगणना संचालनालयातून उपनिबंधक वाय.एस. पाटील, जनगणना अन्वेषक पवन गोडे, राजवर्धन पाटील हे अधिकारी आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे यावेळी उपस्थित होते. या प्रशिक्षणात महसूल विभागाचे चार्ज अधिकारी तथा तहसिलदार, अतिरिक्त चार्ज अधिकारी तथा नायब तहसिलदार, जनगणना महसूल सहायक तथा सहायक महसूल अधिकारी, नगरपालिका नगरपंचायत विभागासाठी चार्ज अधिकारी तथा मुख्याधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक किंवा अवल कारकून, नगररचना विभागाचे अधिकारी- कर्मचारी सहभागी झाले होते.

दि.४ ते दि.६ दरम्यान सकाळी साडेनऊ ते सायं.सहा वा. पर्यंत प्रशिक्षण सुरु राहिल,असे कळविण्यात आले आहे

०००००

संबंधित पोस्ट

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta

दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक दितवाह  चक्रीवादळसदृश्य परिस्थिती समुद्रातून येतंय विध्वंसकारी संकट; IMD कडून ‘ साधगिरीचा इशारा, सतर्क राहा …

vishwatmaklokswamivarta

महाडीबीटीद्वारे मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती;ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

प्रत्येकाने आत्मचिंतन केलेच पाहिजे-राहुल महाराज जोशी हभप सोनवणे महाराज गुरुजी यांचे आज हरिकिर्तन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित-· बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज;· प्रकल्प पुर्तीसाठी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे विशेष प्रयत्न..

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीसंगीत क्षेत्रातील महान तपस्वी हरपला..- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta