vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा-१जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा -१ अंतर्गत जिल्ह्यात ८४ मंडळस्तरावर दि.७ ते १४ मार्च व एप्रिल महिन्यात १० ते १७ एप्रिल या कालावधीत तर नगरपालिकास्तराव ८ ते १५ मे दरम्यान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेस निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन स्वामी, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड आदी उपस्थित होते.

महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी व ग्रामिण भागात नागरिक शेतकरी, विद्यार्थी , महिला यांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान टप्पा-१ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यात हे अभियान राबविण्याची तयारी प्रशासनाने केली असून त्याचे नियोजन या प्रमाणे- मंडळस्तरावर पूर्वतयारी दि.५ मार्च पर्यंत, दि.७ ते १४ मार्च मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.१० ते १७ एप्रिल मंडळस्तरावर शिबिरांचे आयोजन, दि.८ ते १५ मे नगरपरिषद, नगरपंचायत स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

 जिल्ह्यातील ९ तालुके, ८४ मंडळ, ५०० सजा व १३६९ गावांमध्ये हे अभियान राबविण्यात येणार असून सर्व मिळून ८४ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या शिबिरात प्रलंबित फेरफार, अभिलेख दुरुस्ती, ७/१२ नोंदी दुरुस्ती, महसूली कायद्यांची जनजागृत व अंमलबजावणी, पाणंद रस्ते, दाखले वाटप, तुकडे बंदी, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूरी अशा अनेक सेवा दिल्या जाणार आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिली. या अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.

०००००

संबंधित पोस्ट

शिर्डीतील दुहेरी हत्याकांडानंतर संस्थानचा मोठा निर्णय…साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल…

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मराठी भाषेसाठी चालवले जाणारे आंदोलन थांबवण्याचे केले आवाहन..

अकोला जिल्ह्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक झाल्याची माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा चौकशी- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

पुणे म्हाडाच्या रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश स्थानिक नियोजन प्राधिकरणांनी सुसज्ज रस्ते, सोयी सुविधा असणारे म्हाडाचे लेआउट मंजूर करून त्यानुसार प्रकरणपरत्वे एकल किंवसमूह पुनर्विकास करावा

vishwatmaklokswamivarta

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी नवयुवक व नवयुवतींना मोफत प्रशिक्षणाची संधी

शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीसाठी शिबिर