vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

पुणे शहरात गुंगीकारक औषधांची विक्री करणाऱ्यावर कारवाई- गृह राज्यमंत्री योगेश कदम

मुंबई, प्रतिनिधी: पुणे शहरात विनापरवाना व डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय गुंगीकारक औषधे नशा करण्यासाठी तसेच बेकायदेशीर खरेदी-विक्रीच्या उद्देशाने औषधांचा साठा बाळगल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.

     याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला. तर सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपप्रश्न उपस्थित केला.राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, या प्रकरणात पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या पाचही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे.जप्त करण्यात आलेली औषधे ही प्रमाणित असूनती कोणत्याही स्थानिक मेडिकल स्टोअरमधून विकत घेतलेली नाहीत.

तपासादरम्यान संबंधित औषधांचा पुरवठा बाहेरच्या राज्यातून झाल्याची माहिती पुढे आली असून पुरवठा साखळीचा तपास सुरू आहे. दरम्यान, पुणे शहरात बनावट नशेची औषधे तयार करणारी कोणतीही कंपनी आढळून आलेली नाही. पुणे शहरासह राज्यभरात अशा प्रकारच्या औषध विक्री संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून नियमित कारवाई केली जात असल्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी यावेळी सांगितले.

0000

 

 

संबंधित पोस्ट

सैनिक कल्याण विभागात लिपिक-टंकलेखक पदभरतीसाठी अर्ज सादरीकरणास मुदतवाढ

मुंबईत बिहार भवनला विरोध करण्याची राज ठाकरेंची भुमिका संविधान विरोधी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कर्नाटकमधील बंगळूरु इथे सुमारे 22,800 कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

१५३ सायकलस्वार. एक राष्ट्र. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांनी बाकर नासेरच्या ऐतिहासिक विश्वविक्रमी स्पिनला बळ 

छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या धर्मांतरितांच्या ‘शुद्धीकरणा’स ३५० वर्षे पूर्ण!१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा! – हिंदु जनजागृती समितीचे सर्व हिंदु संघटनांना आवाहन

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी