vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…  ‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

जनतेची रेकॉर्डब्रेक उपस्थिती…

‘विजयी संकल्प सभेमुळे’ संपूर्ण खरोळा नगरी झाली कमळमय…🪷

लातूर प्रतिनिधी-

खरोळा सर्कलमधील जनता ही फक्त कार्यशील, कर्तव्यदक्ष, विकासाभिमुख नेतृत्वाच्या मागेच खंबीरपणे उभी रहाते, हे कालच्या खरोळा येथील भारतीय जनता पार्टीच्या भव्य विजयी संकल्प सभेतील उपस्थित जनसागर पाहून नक्कीच लक्षात आलं असेल.

खरोळा सर्कलमधील मायबाप जनतेच्या हितासाठी सत्याची व विकासाची लढाई लढत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्हापरिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचारार्थ विकासमूर्ती आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेब आणि युवा वर्गाचे प्रेरणास्थान श्री. ऋषीकेशदादा कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्यदिव्य अशी ‘विजयी संकल्प सभा’ पार पडली. ✌🏻

यावेळी लातूर ग्रामीणचे विकासपुरुष असलेले कर्तृत्वशाली आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांनी विरोधकांनी खरोळा सर्कलमधील भाजप विषयी सकारात्मक असणारं वातावरण दूषित करण्यासाठी काय-काय खेळी केली, आणि त्यांच्या त्या अयशस्वी खेळी मागची सत्यता काय आहे, याची माहिती जनतेला सांगितली.

त्यासोबतच समस्त जनतेला विकासाची योग्य दिशा दाखवत, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा संपूर्ण खरोळा सर्कलसाठी अशीच वाहत राहणार असल्याचा विश्वास दिला. आणि उद्याच्या 7 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. ✌🏻

त्यासोबतच युवा वर्गाचे प्रेरणास्थान असलेले व एक बुलंद तोफ म्हणून ज्यांना समस्त लातूर ग्रामीण ओळखतो आहे, असे युवानेतृत्व श्री. ऋषीकेशदादा कराड यांनीही आपल्या प्रखर शब्दात जनतेला दिशाभुलीच्या राजकारणापासून दूर राहण्याचे आवाहन केले. आदरणीय रमेशअप्पा कराड साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास आजवर खरोळा सर्कलचा झालेला आहे, तो गतिशील विकास पुढे कोणीही करू शकणार नाही, त्यामुळे येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले. ✌🏻कालच्या सभेला उपस्थित जनसागर पाहून, भारतीय जनता पार्टीला खरचं खूप मोठं बळ मिळाल आहे, आणि न तुटणारा आत्मविश्वास मिळालं आहे.माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुम्ही उद्याच्या 7 तारखेला देणार असलेलं मत हे संपूर्ण खरोळा सर्कलचं भविष्य ठरविणार मत असणार आहे.त्यामुळे खरोळा सर्कलच्या गतिमान विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा. येणारा काळ हा नक्कीच तुमचा असणार आहे,तुमच्या सर्वांगीण विकासाचा सांगणार आहे.

माझा प्रत्येक तास, प्रत्येक मिनिटं व प्रत्येक सेकंद हा खरोळा सर्कलमधील संपूर्ण जनतेच्या सेवेसाठी समर्पित असणार आहे.🙇🏻‍♂️🪷 तुमची आमची ~ भाजपा सर्वांची 🪷धन्यवाद!-तालुकाध्यक्ष (भारतीय जनता पार्टी, रेणापूर)

संबंधित पोस्ट

ऑटोरिक्षा व टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध 1650 तक्रारी प्राप्त ;654 परवानाधारकांचे परवाने निलंबित

vishwatmaklokswamivarta

चेंबूर विधानसभा मतदारसंघात साड्या वाटणाऱ्यांविरुद्ध तक्रार

vishwatmaklokswamivarta

परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीअल्पसंख्यांक उमेदवाराकडून अर्ज आमंत्रित..

vishwatmaklokswamivarta

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांना जीवे मारण्याची धमकी एका आरोपीस अटक

vishwatmaklokswamivarta

पदविका अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद;अर्जासाठी 30 जूनपर्यंत पुन्हा संधी, नवीन वेळापत्रक जाहीर– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबईत उपनगरासह रिमझिम पाऊस सुरू झाला असून राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यल्लो अलर्ट देण्यात आला आहे जोरदार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे

vishwatmaklokswamivarta