भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रश्नांवर कामबंद आंदोलन..
राज्य प्रतिनिधी-,भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित मागण्यांवर विभागातील संघटनांकडुन आजपर्यंत सनदशीर मार्गाने लढा उभारण्यात आला आहे. मा.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण मुंबई, खंडपीठ नागपुर यांचेकडील मुळ अर्ज क्र. ४३६/२०१७ पवनकुमार केवटे व इतर ९८ मधील दिनांक १४/०१/२०२० चे आदेशान्वये अद्यापही तांत्रिक वेतनश्रेणी लागु करण्यात आलेली नाही. तसेच मा.मंत्री महसुल यांचे अध्यक्षतेखाली संघटना प्रतिनिधी यांचेसोबत मंत्रालय, मुंबई येथे दिनांक ०४/०६/२०२५ रोजी झालेल्या बैठकीत दीडशे दिवसांच्या कृती कार्यक्रमात भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांचे मागण्या मान्य करणेबाबत आश्वासित करण्यात आले होते. मात्र दीडशे दिवसांचा कालावधी संपुन तीन महीने झाले असुनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. विभाग व शासन स्तरावरुन याबाबत केवळ वेळकादुपणा करुन कर्मचा-यांचे संविधानिक न्याय हक्कांवर गदा आणण्याचे व दबावतंत्राचा वापर करुन काम सुरु आहे. त्यामुळे न्याय मिळत नसल्याने व्यथित होऊन नाईलाजास्तव राज्यभरातील समस्त कर्मचा-यांनी भूमि अभिलेख कर्मचारी कृति समिती महाराष्ट्र राज्य चे अंतर्गत आंदोलन करण्यावर एकमत झाले आहे..भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांच्या शासन स्तरावरील प्रलंबित मागण्या : १) तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणेबाबत.२) सुधारीत आकृतीबंध (भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांचे वाढीव पदांसह). ३) मोजणी कर्मचा-यांना निश्चित प्रवासभत्ता ठरवुन तो वेतनामध्ये समाविष्ट करणेबाबत. ४) इतर विभागातील अधिका-यांना पुरेसे तांत्रिक ज्ञान नसल्याने त्यांना या विभागात बदली अथवा प्रतिनियुक्ती न देणेबाबत.५) विभागाचे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करणेबाबत.६) शेत रस्ते मोजणी व हद्दकायम बाबत शासन निर्णय दिनांक २९/०८/२०२५ मध्ये सुधारणाकरणेबाबत.७) मोजणी ही बाब धोरणात्मक बाब म्हणुन अंतर्भूत करण्यात येऊ नये.८) भूमि अभिलेख विभाग हा तांत्रिक विभाग असल्याने जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे संवर्ग पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतुन (IndianEngineering Services) भरणेबाबत.९) श्री.कमलाकर सुधाकर हट्टेकर, उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांची विभागाबाहेर बदली करणेबाबत.भूमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांच्या जमाबंदी आयुक्त स्तरावरील प्रलंबित मागण्या : १) ई-मोजणी व्हर्जन २ सॉफ्टवेअर हे व्हर्जन १ प्रमाणे सुटसुटीत व वापरास सोपे (User Friendly) करणेबाबत.२) अधिकारी /कर्मचा-यांवर नियुक्ती प्राधिकारी यांचे परवानगी व चौकशी शिवाय थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची चुकीची व अमानवी पद्धत बंद करणेबाबत.३) १८ मोजणी प्रकरणांबाबत आपलेकडील दिनांक १४/०१/२०२६ चे अन्यायकारक परिपत्रक रद्द करणेबाबत.४) प्रत्येक कर्मचा-याला पुरेसे व स्वतंत्र मोजणी साहीत्य रोवर, लॅपटॉप, डाटा कार्ड इ. पुरविणेबाबत. (पुरेसे मोजणी साहीत्य नसल्याने विभागाची प्रतिमा जनमानसात मलिन होत आहे.)५) शासकीय सुटीचे दिवशी अपवाद वगळता कोणतेही कामकाज करण्यात येऊ नये याबाबत संबंधितांना सुचना देणेबाबत.६) अन्यायकारक प्रतिनियुक्ती बंद करणेबाबत.७) अतिरिक्त कामकाज केल्यास त्याचा मोबदला नियमानुसार देणेबाबत.८) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख यांचे स्तरावरुन नियमबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या वेतन वसुली आदेश थांबविणेबाबत.उपरोक्त मागण्यांवर आंदोलनाची रुपरेषा खालीलप्रमाणे आहे :१) दिनांक १८/०२/२०२६ रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करणे’ व काळ्या फिती लावुन फक्त कार्यालयीन कामकाज करणे.२) दिनांक २०/०२/२०२६ पासुन मोजणी काम बंद ठेवुन काळ्या फिती लावुन फक्त कार्यालयीन कामकाज करणे.३) दिनांक २३/०२/२०२६ ते २६/०२/२०२६ या काळात सामुहीक रजा आंदोलन करणे.असहकार आंदोलन४) दिनांक २७/०२/२०२६ रोजी मा. जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढुन धरणे आंदोलन करणे.५) उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास दिनांक ०२/०३/२०२६ पासुन संपुर्ण बेमुदत कामबंद आंदोलन करणे.उपरोक्त नमुद केलेप्रमाणे राज्यभरातील समस्त कर्मचारी आंदोलनात सहभागी होणार असुन याची पुर्ण जबाबदारी ही शासनाची असेल.