vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

रायगड जिल्ह्यातील नागरिकांनी मतदारयादीतील ‘मॅपिंग’ प्रक्रियेत सहभागी व्हावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

*रायगड-अलिबाग, प्रतिनिधी* भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाची’ (SIR) पूर्वतयारी सध्या सुरू आहे. या अंतर्गत रायगड जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील मतदारांचे ‘सन २००२ च्या मतदार यादीशी मॅपिंग’ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे

*मॅपिंग प्रक्रिया नेमकी काय आहे?*   सन २००२ मध्ये शेवटचा सखोल पुनरिक्षण कार्यक्रम झाला होता. आता पुन्हा तीच प्रक्रिया राबवली जाणार असल्याने, सध्याच्या मतदार यादीतील नावांची जुन्या (२००२ च्या) नोंदींशी सांगड घातली जात आहे. हे मॅपिंग दोन प्रकारे करता येईल:

१. Person to Person Mapping: ज्या मतदारांचे नाव २००२ च्या यादीत आधीपासूनच होते, त्यांनी थेट स्वतःच्या नावाचे मॅपिंग करावे.२. Progeny Mapping: ज्या तरुण मतदारांची नावे २००२ मध्ये नव्हती, त्यांनी आपल्या आई-वडील किंवा आजी-आजोबांच्या २००२ मधील नावाचा आधार घेऊन आपले नाव लिंक (Mapping) करावे.

*तुमचा २००२ चा तपशील कसा शोधाल?**    मॅपिंगसाठी मतदारांना त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचा २००२ मधील यादीभाग क्रमांक (Part No.) आणि अनुक्रमांक (Sr. No.) आवश्यक आहे. हा तपशील मिळवण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे:    भारत निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्यावी. तेथे उपलब्ध असलेल्या २००२ च्या मतदार यादीच्या PDF फाईल्समधून आपल्या कुटुंबाचा जुना तपशील शोधावा.

*नागरिकांनी काय करावे?*१. ऑनलाईन पोर्टलवरून स्वतःचा किंवा पूर्वजांचा २००२ मधील तपशील मिळवावा.

२. हा तपशील घेऊन आपल्या क्षेत्रातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांची भेट घ्यावी.

३. याशिवाय, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून आपले आणि आपल्या कुटुंबाचे मॅपिंग पूर्ण झाल्याची खात्री करावी

     “मतदार यादी अधिक पारदर्शक आणि निर्दोष करण्यासाठी हे मॅपिंग अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपल्या संबंधित ‘बीएलओ’शी संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

0000000000

संबंधित पोस्ट

आदिवासींची समृद्ध संस्कृती आणि गौरवशाली इतिहास जपणे ही सर्वांची जबाबदारी–आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके*

प्रसारमाध्यम प्रतिनिधींसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या सूचना-मतदान गोपनीयतेच्या हक्काचे उल्लंघन होता कामा नये छायाचित्र, छायचित्रण निर्देशित अंतरावरुनच करणे बंधनकारक..

vishwatmaklokswamivarta

बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय पटावर महाराष्ट्राचे नाव, दिव्या देशमुख भारताचा अभिमान..! विश्वविजेत्या दिव्या देशमुख यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिनंदन

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर

देशातील सर्व दलितांनी एकत्र येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करावा मायावती यांनी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

इंग्लंडच्या प्रिन्स एडवर्ड यांची राज्यपालांशी भेट;भारत – ब्रिटन परस्पर सहकार्य वाढविण्यावर चर्चा…

vishwatmaklokswamivarta