vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

*मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व बीज भांडवल कर्ज योजना 100 टक्के उद्दिष्टपूर्ती*

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी :- सुशिक्षित बेरोजगार युवक/युवती यांना स्वता:चा उद्योग व्यवसाय सुरु करण्याकरिता शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत सन 2025-26 करीता जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 576 व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 384 असे 960 चे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण 2 हजार 427 प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणांपैकी एकूण 965 प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या 100 टक्के जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी केली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयाकडून सूक्ष्म नियोजन करुन सलग दुसऱ्या वर्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

    केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 14 व खादी ग्रामोद्योग मंडळ रायगड-अलिबाग या अंमलबजावणी यंत्रणेस 14 व खादी ग्रामोद्योग आयोग या अंमलबजावणी यंत्रणेस 06 असे एकूण 34 प्रस्तावांचे भौतिक उद्दिष्ट होते. त्यानुषंगाने सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील विविध बँक शाखेकडे एकूण 146 प्रस्ताव शिफारस करण्यात आले होते. या प्रकरणापैकी एकूण 70 प्रकरणात बँक शाखेद्वारे मंजूरी असून उद्दिष्टांच्या 100 टक्के पेक्षा जास्त उद्दिष्टांची पूर्तता यावर्षी करण्यात आली आहे.

   तसेच बीज भांडवल कर्ज योजना अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, रायगड करिता प्राप्त उद्दिष्टांची देखील 100 टक्के पूर्तता केली आहे.

      यासाठी विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी किशन जावळे, उद्योग सहसंचालक, कोकण विभाग श्रीमती विजू सिरसाठ, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक विजयकुमार कुलकर्णी तसेच सर्व बँक क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा बँक समन्वयक यांनी मोलाचे सहकार्य केल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी.एस. हरळय्या यांनी कळविले आहे.

०००००००

संबंधित पोस्ट

आज महाराष्ट्र सरकारचा स्टारलिंकसोबत करार

vishwatmaklokswamivarta

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा तातडीने पूर्ण करा- उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याच्या पूर्वतयारीची आढावा बैठक

जिल्हा वार्षिक योजनेतील कामे कालमर्यादा आखून पूर्ण करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील- जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका यंत्रणांचा योजनानिहाय आढावा…

vishwatmaklokswamivarta

गुन्हेगारी घटनांवर नियंत्रणासाठी जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांचा आढावा घ्यावा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील,क्राईम टास्क फोर्सच्या बैठकीत केल्या सूचना…

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

15 फेब्रुवारी संत सेवालाल महाराज जयंती विशेष लेख-जीवन, विचार, सामाजिक परिवर्तन आणि मानवतेचे दीपस्तंभ- संत सेवालाल महाराज.

vishwatmaklokswamivarta