vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

*’साधना सप्ताहाच्या’ माध्यमातून शासकीय कर्मचारी होणार ‘फ्युचर रेडी’**कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचे यंत्रणेला निर्देश**कोकण विभाग सज्ज: 02 ते 08 एप्रिल दरम्यान राबविले जाणार विशेष अभियान*

नवी मुंबई, प्रतिनिधी: प्रशासकीय कामात गतिमानता आणण्यासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘साधना सप्ताह’ (Strengthening Adaptive Development and Human Aptitude for National Advancement) आयोजित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कोकण विभागातील सर्व शासकीय यंत्रणांच्या प्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा बैठक घेतली. दि. 02 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीत चालणाऱ्या या सप्ताहात कोकण विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी दिले.

 प्रशासनात कार्य करणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करता यावा यासाठी विविध प्रशिक्षणांद्वारे क्षमता विकास करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने क्षमता विकास आयोग (सीबीसी) आणि-कर्मयोगी भारत यांच्या संयुक्त विद्यमाने दि.02 ते 08 एप्रिल 2026 या कालावधीत ‘साधना सप्ताह’ आयोजित केला आहे. महाराष्ट्रातही मंत्रालयीन व राज्यभरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ‘साधना सप्ताह’ अंतर्गत ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ‘साधना’ (Strengthening Adaptive Development and Human Aptitude for National Advancement) सप्ताहाचा मुख्य उद्देश शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवणे हा आहे. iGOT (Karmayogi Bharat) या पोर्टलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना विविध कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करायचे आहेत.

   प्रत्येक कर्मचाऱ्याने या सात दिवसांच्या कालावधीत किमान 4 तासांचे अभ्यासक्रम (Courses) पूर्ण करणे आवश्यक आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI), डेटा अ‍ॅनालिटिक्स, ब्लॉकचेन, आणि प्रभावी संवाद कौशल्य यांसारख्या आधुनिक विषयांवरील कोर्सेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. कोकण विभागातील जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करून ‘कौशल्यपूर्ण प्रशासना’त आपले योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.*उत्कृष्ट कामगिरीचा होणार गौरव*

या मोहिमेत उत्तम कामगिरी करणाऱ्या विभागांना आणि जिल्हा प्रशासनाला विशेष गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणाऱ्या ‘टेक वारी २.०’ (Tech Wari 2.0) या कार्यक्रमात उत्कृष्ट विभागांना सन्मानित केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

      “बदलत्या काळासोबत प्रशासनाने अद्ययावत होणे ही काळाची गरज आहे. साधना सप्ताहाच्या माध्यमातून मिळणारे हे ऑनलाईन प्रशिक्षण कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक प्रगतीसोबतच शासकीय कामाचा दर्जा सुधारण्यास मदत करेल. कोकण विभागाने यामध्ये आघाडी घ्यावी, अशी अपेक्षा कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीला कोकण विभागातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी आणि इतर संबंधित विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

राज्यभरात एफडीएची औषधांवरील आक्षेपार्ह जाहिराती व मिसब्रँडेड औषधसाठ्यांविरुद्ध धडक मोहीम अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १६ मार्च रोजी वितरण

महाराष्ट्रासाठी ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला केंद्र सरकारची मंजुरी

हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० वा शहीदी समागम कार्यक्रम;शाळास्तरावर दि.१५ पासून जनजागृतीसाठी विविध उपक्रम..

vishwatmaklokswamivarta

कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ,• ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने’ तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ• कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम; गुन्हे सिद्धतेच्या दरात वाढ, सायबर गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 7 फेब्रुवारी रोजी सुट्टी   

vishwatmaklokswamivarta